Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JOB: आज कल्याण मध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; थेट मुलाखती अन् भरती

Jobs

JOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.

Job: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आज(17 डिसेंबर), शनिवारी कल्याण(Kalyan) येथील पंडीत दीनदयाळ उपाध्याय येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात विविध नामांकीत कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13,109 रिक्तपदांसाठी कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha) यांनी केले आहे.

यांच्या हस्ते होणार उदघाटन?

या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून थेट मुलाखत घेणार आहेत. सकाळी 10 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिसगाव, गुणगोपाळ मंदिर मैदान, चक्की नाका चौक, कल्याण (पूर्व) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय उद्योजकता मार्गदर्शन( Business Guidance) आणि करियर समुपदेशन(Career Counseling) अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

कोणासाठी असतील नोकरीच्या संधी

नववी, दहावी, ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट, आयटीआय, इंजिरिअरिंग अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी बँकेतील नोकरी, एचआर, ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफीसर, सेल्स ऑफीसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारच्या एकूण 13,109 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेण्यात येतील.

'या' कंपन्या होतील सहभागी

या रोजगार मेळाव्यात क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड, एएससीआयआय प्रा. लि., स्टेल्थ हेल्थ मॅनेजमेंट, रिलायबल लॅब्स, घार्डा केमिकल्स, हॉकीन्स कुकर्स, पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, आदिश कन्सलटन्सी, इंडो अमाईन्स, रिलायबल एचयूबी इंजिनिअरीग (इंडिया), पितांबरी प्रॉडक्टस्, भारत गिअर्स, सुयश ग्लोबल, सँडस् सिनर्जी, पुरोहीत टेक्सटाईल अँड प्रॉडक्टस्, प्रोमोज इंजिनिअरींग, जेड रबर प्रॉडक्ट, कल्पवृक्ष, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, बीईडब्ल्यू इंजिनिअरींग, मार्करीच ॲप्रल, नेक्सजी ॲप्रल एलएलपी इ. नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग

या रोजगार मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणाऱ्या विविध शासकीय महामंडळांनी सहभागी घेतला असून यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,  मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांनी विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावले आहेत.  या स्टॉलद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश यामध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही यामध्ये देण्यात येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरीसाठी  इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवून रोजगाराच्या संधी प्राप्त करुन घ्याव्याअसे आवाहन करण्यात आले आहे.