Pune-Amravati Special Train: अमरावती जिल्ह्यातील अनेक तरुण- तरुणी पुण्यामध्ये नोकरी, शिक्षण घेतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या मुलांना घरी येण्याआधी तिकीट सुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांना धक्के खात पुण्यातून घरी पोहचावे लागते. बडनेरा जंक्शनवरुन रेल्वे पकडण्यासाठी घरून दुपारीपासून निघणे, जेवणाची सोय नाही. तिकीट मिळाली नाही तर धक्के खात पुणेमध्ये पोहचणे. यासारख्या अनेक समस्या अमरावतीकरांना येत होत्या. त्याचबरोबर ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट, आणि अडचणीच्या प्रवासातून आता सुटका होणार यामुळे अमरावतीकर आनंदात आहेत. मध्य रेल्वेकडून पुणे आणि अमरावतीकरांसाठी अजून एका रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या एक्सप्रेसचा क्रमांक 01452 आहे.
कधी पासून सुरू होणार ट्रेन?
ही एक्सप्रेस पुण्याहून येत्या 17 तारखेला रवाना होणार आहे. त्याचबरोबर 01451 क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस ही 18 तारखेला धावणार असून यामुळे प्रवाशांना अत्यंत आनंद झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी जावून आराम करण्याच्या दृष्टीने ही ट्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ट्रेनचे बुकिंग 13 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे, आणि 27 जूनपर्यंत म्हणजे मुलांच्या शाळा, कॉलेज सुरू होई पर्यंत राहणार आहे.
पुणेपासून अमरावतीपर्यंत जाण्यासाठी 13 एक्सप्रेस उपलब्ध आहेत, पण त्या डेलीसाठी नाही. त्यातील 2 ट्रेन दररोज धावतात, महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि आझाद हिंद एक्स्प्रेस. बाकी सर्व ट्रेन आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच धावतात. अमरावती ते पुणे प्रवास करतांना प्रवाशांना अनेक समस्या होत्या म्हणून त्यांनी अमरावतीवरुन नियमित एक्सप्रेसची मागणी केली.
विशेष ट्रेन कोणकोणते स्टॉप घेईल?
- मध्य रेल्वेने सुरू केलेली ही विशेष ट्रेन साप्ताहिक आहे.
- 01452 क्रमाकांची पुणे-अमरावती एक्स्प्रेस 17 एप्रिलपासून दर सोमवारी राहील.
- पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 7.55 ला सुटेल आणि मंगळवारी सकाळी 11 वाजता अमरावती स्टेशनवर पोहचेल.
- रिटर्नसाठी 01452 अमरावती-पुणे एक्स्प्रेस 18 एप्रिलपासून दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी 5.55 वाजता सुटेल.
- बुधवारी 6.30 ला पुणे स्टेशन पोहचेल.
- ही ट्रेन बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर येथे स्टॉप घेईल.
तिकीट किती असेल?
आयआरसीटीसी App वर चेक केले असता 01451/Amravati - Pune Special Fare AC SF Summer Special असे या एक्सप्रेसचे नाव येते. एसी म्हणजेच वातानुकूलित असल्याने याची तिकीटसुद्धा बाकी ट्रेनप्रमाणे 3 AC चे 1400 रुपये आहे. इतर AC ट्रेन प्रमाणे सर्व सुविधा यात उपलब्ध असतील.