Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GoFirst Crisis: गो फर्स्टची उड्डाणे रद्द, रिफंड देण्यासाठी सुरु केली नवी वेबसाईट

GoFirst Crisis

Image Source : www.indiatoday.in

याआधी 26 मे 2023 पर्यंतची सर्व उड्डाणे GoFirst कंपनीने रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. अलीकडेच विमान उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील एअरलाइन्सला विमानप्रवास भाडे नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला होता. गो फर्स्टच्या दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्यांनी भाडेवाढ केली होती.

गो फर्स्ट ही एअरलाइन सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गो फर्स्ट एअरलाइनच्या समस्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. दिवाळखोरीचा सामना करत असलेल्या गो फर्स्टने आता 28 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.तशी अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे.  गो फर्स्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत प्रवाशांना माहिती दिली आहे. सध्या एअरलाइन ऑपरेशनल समस्यांचा सामना करत असल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे गो फर्स्टने जाहीर केले आहे.

याआधी 26 मे 2023 पर्यंतची सर्व उड्डाणे कंपनीने रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. अलीकडेच विमान उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील एअरलाइन्सला विमानप्रवास भाडे नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला होता. गो फर्स्टच्या दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्यांनी भाडेवाढ केली होती.

ट्विट करून दिली माहिती

GoFirst ने ट्विट करत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला कळविण्यास खेद वाटतो की ऑपरेशनल समस्यांमुळे 28 मे 2023 पर्यंत गो फर्स्टची सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना लवकरच त्यांचा रिफंड मिळेल.

पुढे असे देखील म्हटले आहे की, प्रवाशांच्या समस्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून लवकरच आम्ही विमान बुकिंग सुरु करणार आहोत.

रिफंडसाठी नवीन वेबसाइट 

प्रवाशांना आपले तिकीट रद्द करून परत पैसे, म्हणजेच रिफंड मिळवण्यासाठी आधी देखील खूप त्रास सहन करावा लागला होता. एकाचवेळी अनेक लोक वेबसाईटवर आल्यामुळे GoFirst वारंवार डाऊन होत होती. यावर उपाय म्हणून GoFirst ने रिफंडसाठी नवीन वेबसाईटही सुरू केली आहे. https://bit.ly/3MPFlwf या लिंकवर क्लिक करून ग्राहक रिफंडसाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

उड्डाणे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा 

'गो फर्स्ट'वर विविध बँकांची कर्जे , पुरवठादार आणि विमानांच्या भाड्यापोटी एकूण 11463 कोटींचे देणी बाकी आहेत. दिवाळखोरीच्या याचिकेनुसार कंपनीवर बँक ऑफ बडोदा 1300 कोटी, आयडीबीआय बँक 50 कोटी आणि सेंट्रल बँकेचे 2000 कोटींचे कर्ज आहे. इतक्या मोठ्या रकमेची परतफेड करणे गो फर्स्टला शक्य झाले नाही त्यामुळे  2 मे 2023 रोजी कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT)  जाहीर केले होते. त्यानंतर कंपनीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या कंपनीने मात्र लवकरच आम्ही पुन्हा ग्राहकांच्या सेवेत हजर राहू असे म्हटले आहे.