Gleeden Dating Apps: स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग जवळ आहे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डेटिंग अॅप्सच्या(Dating Apps) वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीमध्ये विवाहबाह्य डेटिंग अॅप्सच्या वापराकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अॅप ‘ग्लीडेनने(Gleeden)' सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे फक्त भारतात आहेत. नेमकं काय म्हणतोय ग्लीडेनने जाहीर केलेल्या माहितीचा अहवाल, चला जाणून घेऊयात.
ग्लीडेनची माहिती काय सांगते?
फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अॅप ‘ग्लीडेनने (Gleeden)' सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स म्हणजेच 20 लाख युजर्स हे फक्त भारतात(India) आहेत. सप्टेंबर 2022 पासून भारतीय युजर्समध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कंपनीने म्हणण्यानुसार यातील नवीन युजर्स हे 66 टक्के टियर 1 शहरांमधून आले आहेत, उर्वरित 44 टक्के टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून आल्याचे पाहायला मिळत आहेत. ग्लीडेन हे विवाहित लोकांसाठी जगातील पहिले विवाहबाह्य संबंध डेटिंग अॅप(Dating App) 2009 मध्ये फ्रान्समध्ये लाँच केले आणि 2017 मध्ये भारतात याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला.
या व्यवसाय क्षेत्रातील युजर्सची संख्या जास्त
ग्लीडनचे भारताचे कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल(Sybil Scheidel, Country Manager, India) यांनी एका निवेदनात असे म्हटले आहे की, भारत असा देश आहे जिथे अॅपवरील युजर्सची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. 2022 मध्ये 18 टक्क्यांहून अधिक नवीन युजर्स हे अॅप वापरू लागले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये ही संख्या 1.7 दशलक्ष होती, जी आता 2 दशलक्षांपेक्षा जास्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे अॅप विशेषतः विवाहित लोकांसाठी डिझाइन केले गेले असून ग्लीडनवरील भारतीय युजर्सची वाढ दाखवून देते की, देशातील एकपत्नीत्वाच्या पारंपारिक संकल्पना हळू हळू बदलत चालल्या आहेत. अनेक जोडपी एकमेकांच्या सहमतीनेही हे अॅप वापरत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ग्लीडनवरील बहुतेक भारतीय युजर्स हे हाय प्रोफाईल आहेत. यातील पुरुष आणि स्त्रिया दोघेही इंजिनिअर, उद्योजक, सल्लागार, व्यवस्थापक, अधिकारी आणि डॉक्टर अशा व्यावसायिक क्षेत्रातील आहेत.