Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ChatGpt Duplicate App: प्ले स्टोअरवरून Chat Gpt डाउनलोड करत असाल तर बनावट अ‍ॅप पासून सावधान!

ChatGpt Duplicate App

ChatGpt Duplicate App: सध्या प्ले स्टोअरवर 'ChatGpt' सर्च केले की बरेच बनावट अ‍ॅप पाहायला मिळत आहेत.

ChatGpt Duplicate App: सध्याच्या काळात 'ChatGpt' हे खूप चर्चेत असलेले माध्यम असून याला तुम्ही जे विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीनुसार तो आपल्याला उत्तर देतो. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळात हवी असलेली माहिती सहज मिळत असून ती शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जावे लागत नाही. पण सध्या या अ‍ॅप संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. जर तुम्ही प्लेस्टोअरवरून 'Chat Gpt' डाउनलोड करत असाल तर बनावट अ‍ॅप पासून सावधान राहायला हवे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

बनावट अ‍ॅप पासून सावधान

ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. एखादी गोष्ट जास्त लोकप्रिय झाल्यास त्यावरून पैसे मिळवण्याचे लोक वेगवेगळे मार्ग शोधतात. त्यामुळे प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर अनेक बनावट अ‍ॅप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.  तुम्ही प्लेस्टोअरवर ChatGPT सर्च केल्यास अनेक बनावट अ‍ॅप तुम्हाला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, “ChatGPT, Chat GPT AI with GPT-3”.  गुगल प्ले स्टोअरवर 'ChatGPT' शोधल्याने त्यांच्या नावातील कीवर्डसह अनेक फेक ऍप्लिकेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवर बनावट Chat Gpt आढळून आल्यास त्याच्या लिसिटनग पेजवर जाऊन उजवीकडे असणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर ते चुकीचे आहे म्हणून त्यावर क्लिक करावे. तिथे तुम्हाला हे का चुकीचे वाटले असा प्रश्न कारण विचारले जाईल तेव्हा तिथे ‘कॉपीकॅट’ असे उत्तर लिहा. तुम्हाला प्रत्येकवेळी ChatGPT वेबसाईटवर जाणे पसंत नसल्यास त्याऐवजी एखादे अ‍ॅप तुम्ही वापरू शकता. अधिकृत ChatGPT वापरण्याचा हा फायदा आहे की त्यावर जाहिराती पाहायला मिळत नाहीत.

अधिकृत ChatGPT अ‍ॅप वापरण्यासाठी खालील प्रक्रिया करा

  • गुगल क्रोम वर जाऊन chat.openai.com उघडा
  • openai या अकाउंटवर लॉग इन करा
  • जेव्हा तुम्हाला ChatGPT दिसेल तेव्हा उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा
  • शॉर्टकट तयार करण्यासाठी होम स्क्रीनवर आणण्यासाठी क्लिक करा