Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani यांची सून Paridhi Adani 'या' क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या अधिक माहिती!

Paridhi Adani

Image Source : www.wikibio.in

उद्योजक गौतम अदानी यांचा मुलगा, करण अदानी सध्या अदानी पोर्ट (Adani Port)या अदानी ग्रुपच्या कंपनीचे सीईओ आणि संचालक म्हणून काम करत आहेत. अदानी उद्योगसमूहाची महत्वाची जबाबदारी करण अदानी सध्या सांभाळत आहेत. परंतु अनेकांना माहित नाही की करण यांची पत्नी, म्हणजेच गौतम अदानी यांची सून काय काम करते.

जगातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक उद्योगपती म्हणून गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नाव घेतले जाते. गौतम अदानी यांचे व्याही आहेत सिरिल श्रॉफ (Cyril Shroff). देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट वकीलांपैकी ते एक आहेत. सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी (Paridhi Adani) आणि गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी (Karan Adani) यांचे 2013 मध्ये लग्न झाले आहे.   


या लग्नाच्या अनेक चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राजकीय आणि व्यावसायिक व्यक्तींनी लग्नाला हजेरी लावली होती. जुलै 2016 मध्ये करण आणि परिधी यांना मुलगी झाली. करण सध्या अदानी पोर्ट (Adani Port)या अदानी ग्रुपच्या कंपनीचे सीईओ आणि संचालक म्हणून काम करत आहेत. अदानी उद्योगसमूहाची महत्वाची जबाबदारी करण अदानी सध्या सांभाळत आहेत. परंतु अनेकांना माहित नाही की करण यांची पत्नी, म्हणजेच गौतम अदानी यांची सून काय काम करते.  


गौतम अदानी यांची सून परिधी या व्यवसायाने कॉर्पोरेट वकील (Corporate Advocate) आहेत. परिधी त्यांच्या वडिलांच्या सिरिल अमरचंद मंगलदास कंपनीशी संबंधित आहे आणि आघाडीच्या कॉर्पोरेट हाऊसेस, स्टार्टअप्स इत्यादींना कायदेशीर सल्ला देतात. परिधीच्या वडिलांची लॉ फर्म 100 वर्षांहून जुनी आहे आणि देशातील सर्वात महागड्या कॉर्पोरेट वकीलांमध्ये त्यांची गणना केली जाते. करण आणि परिधी अदानी हे प्रोफेशननुसार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असले तरी दोघांचे बाँडिंग खूप चांगले मानले जाते. 


अमेरिकन पर्ड्यू विद्यापीठातून शिक्षण घेतलेले करण अदानी 2017 पासून वडिलांचा व्यवसाय हाताळत आहेत. अनेकवेळा उघडपणे ते आपले मत मीडियासमोर मांडताना दिसले आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात करण अदानी म्हणाले की, आजपर्यंत अदानी समूहाचे एकही कर्ज थकलेले नाही . याशिवाय वडील गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या नात्याबाबतही त्यांनी उघडपणे सांगितले होते की, ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते त्यांचे मित्र आहेत . करण अदानी यांनी गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे सांगून त्यात कोणाचेही हितसंबंध गुंतलेले नसल्याचं म्हटलं आहे.