Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Delhi Metro: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मेट्रोतून करता येणार मोफत प्रवास, कसा जाणून घ्या

Delhi Metro

Image Source : www.thebetterindia.com

Republic Day 2023: भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून कुपन दिले जात आहे. याबद्दल जाणून घ्या.

Republic Day 2023: भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या 2 दिवसावर आला आहे. याच निमित्ताने भारत सरकारकडून कर्तव्य पथावर अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.  26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा(Free Traveling Facility) देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून(Delhi Metro) कूपन देण्यात येणार आहे. चला तर दिल्ली मेट्रोच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोणासाठी असेल फ्री कुपन?

26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून कूपन देण्यात येणार आहे. हे कुपन ई-निमंत्रण कार्ड किंवा ई-तिकीटधारकांना(e-invitation card or e-ticket) दिले जाणार आहे. हे कुपन तुम्ही मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावरुन मिळवू शकणार आहेत. गुरुवारी सकाळी 04:30 ते 08:00 दरम्यान प्रवासासाठी तिकीट किंवा कूपन जारी केले जाणार आहे मात्र, या कूपनद्वारे तुम्हाला दुपारी 02:00 वाजेपर्यंतच  मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.

निवेदनात काय सांगितले आहे?

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना केंद्रीय सचिवालय किंवा उद्योग भवन किंवा मंडी हाऊस मेट्रो स्टेशनमधूनच बाहेर पडावे लागणार आहे. एका निवेदनातील मेट्रो अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार लोकांना सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र(Photo Identity) घेऊन जावे लागणार आहे. तसेच, होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन(DMRC) तिन्ही स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी(Employees) सुरक्षा तैनात केली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून यावेळी पाहुण्यांना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिकेऐवजी ई-निमंत्रण पाठवले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने एक विशेष वेब पोर्टल aamantran.mod.gov.in प्रजासत्ताक दिन परेड आणि बीटिंग रिट्रीट समारंभ या दोन्हींसाठी तिकीट विक्री देखील सुरु केली आहे. शिवाय, तिकिटे ऑनलाईन(Online) आणि ऑफलाईन(Offline) खरेदी करता येणार आहेत. तुम्हालाही यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर aamantran.mod.gov.in वर जाऊन थेट तिकीट खरेदी करु शकता. याशिवाय, मूळ फोटो ओळखपत्राच्या मदतीने समर्पित बूथ किंवा काउंटरवरुन थेट तिकिटे खरेदी केली जाऊ शकतात. पाच वर्षांच्या आतील लहान मुलांना मात्र याठिकाणी परवानगी नाही. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी 20 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत तिकीट दर असतील, तर बीटिंग रिट्रीटसाठी(28 जानेवारी 2023)  20 रुपये तिकिटांची किंमत असेल.