Republic Day, Bharat Parv 2023: भारताच्या इतिहासातील, स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे, प्रजासत्ताक दिन! 26 जानेवारी रोजी प्रत्येक भारतीय हा दिन उत्साहात साजरा करतात. यंदा देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या विशेष प्रसंगी, दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य संचलानाचे आयोजन केले जाते. या संचलनातमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स भाग घेतात.
26 जानेवारीलाच प्रसात्ताक दिन का? (Why is January 26 Republic Day?)
26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी, 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आल्याचे कारण, सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीलाच साजरा केला जात होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी आणि समितीच्या 308 सदस्यांनी अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या हस्तलिखितावर स्वाक्षी केली. त्यानंतर दोन दिवसांनी, 26 जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी 26 जानेवारी 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10.18 वाजता भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
भारत पर्व सोहळा (Bharat Parva ceremony)
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सहसा 24 जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाचा भारत पर्व कार्यक्रम 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने सुरू होणार आहे. हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यासह 23 आणि 24 जानेवारीला जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर लष्करी टॅटू, आदिवासी नृत्य महोत्सव आणि आदि-शौर्य - पराक्रमाचे पर्व' आयोजित केला जाणार आहे. गौर मारिया, गड्डी नाती, सिद्दी धमाल, बैगा परधोनी, पुरुलिया, बगुरुंबा, घुसडी, बाल्टी, लंबाडी, पायका, राठवा, बुडीगली, सोंगीमुखवट्टे, कर्मा, आंबा, का शाद मस्ती, कुम्मिकाली, पल्यार, चेरवा आणि रेखाम पाडा आदी पारंपरिक नृत्ये सादर होणार आहेत. यासह, भारतीय सशस्त्र दलाचा घोडेस्वारी, खुकुरी नृत्य, गटका, मल्लखांब, कलारीपयट्टू, थांग-ता, मोटरसायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल, नेव्ही बॅंड आणि मार्शल आर्ट्स सादर केले जाणार आहेत. अखेरच्या दिवशी गायक कैलास खेर हे गाण्यांचे सादरकीकरण करणार आहेत.
25 जानेवारी रोज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजादी का अमृत महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांनी पारितोषिके देणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. तर 26 तारखेला विविध राज्यांमधील कलाकारांमार्फत, संरक्षण मंत्रालयामार्फत संचलन होणार आहे. तसेच यात नृत्याविष्कार, अखिल भारतीय स्कूल बँड पथकांचा कार्यक्रम, इतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सव आणि भारतीय हस्तकला बाजार भरणार आहे. विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठा ड्रोन शो यावेळी पाहायला मिळणार आहे.
27 जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधणार आहेत. 29 जानेवारी रोजी रायसीना हिल्सवर बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान तिन्ही सेवांचे बँडचे मार्चपास्ट करणार आहेत.
भारत पर्व कार्यक्रमाचा अंदाजित खर्च (Estimated cost of Bharat Parva)
प्रजासत्ताक दिनानिमित्त, भारत पर्व हा सोहळा 23 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. हा सोहळा भारतीय पर्यटन मंत्रालयाद्वारे (Indian Ministry of Tourism) आयोजित करण्यात येत आहे. या संपूर्ण सोहळ्याचा अंदाजित खर्च 3 कोटी 50 लाख रुपये आहे. तसेच खरदे-विक्री पदर्शनातून सरकारला काही पैसे मिळणार आहेत.