Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाला फक्त 15 दिवस उरलेले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि देशाच्या शूर सैनिकांचे अदम्य साहस पाहतात. तुम्हीही यावेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. होय, आता तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तुमच्या घरून ऑनलाइन तिकीट सहजपणे बुक करू शकता.
आमंत्रण पोर्टल लॉंच (Amantran Portal Launch)
6 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल लाँच केले. या पोर्टलद्वारे, तुम्ही केवळ प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठीच नव्हे तर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठीही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. या निमंत्रण पोर्टलमुळे लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि छपाईसाठी वापरल्या जाणार्या मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होईल.
तिकीट कसे बुक करावे? (How to book tickets?)
- प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी, प्रथम आमंत्रण पोर्टलच्या वेबसाइटला भेट द्या.
- सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- यासाठी तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता यांसारखी मूलभूत माहिती टाकावी लागेल.
- यानंतर, कॅप्चा कोड टाकून ओटीपीसाठी रिक्वेस्ट करावी लागेल.
- आता तुम्हाला OTP टाकावा लागेल. OTP टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर, सर्वप्रथम तुम्हाला ज्या category साठी तिकीट खरेदी करायचे आहे ती category निवडावी लागेल.
- category निवडल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.
- पेमेंट केल्यानंतर, तुमचे ई-तिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- हे ई-तिकीट डाउनलोड करा आणि तुमच्या फोनवर सेव्ह करा.
- एका वेळी जास्तीत जास्त 10 तिकिटे बुक करता येतील