लियोनेल मेस्सीची (Lionel Messi) अर्जेंटिना (Argentina) टीम फिफा फुटवॉल वर्ल्ड कपच्या (FIFA Football World Cup 2022) फायनलमध्ये गेलीय. आणि टीमला इथपर्यंत पोहोचवण्यात लियोनेल मेस्सीचा (Lionel Messi) मोठा वाटा होता. त्यामुळे फायनल आधी मेस्सीच्या नावाची जोरदार चर्चा होतेय. तशी त्याच्या कामगिरीमुळे ती होतच असते. पण, यावेळी मेस्सी कदाचित आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत असल्यामुळे या वर्ल्ड कप फायनलला (FIFA World Cup Final) वेगळी मज्जा आहे.
अर्जेंटिना टीमही (Argentina National Football Team) 1986 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचलीय. पण, इथं आपण बोलणार आहोत ते लियोनेल मेस्सीच्या लाईफस्टाईलबद्दल. ला लिगा मधल्या रियल माद्रिद टीमबरोबर करारबद्ध असलेला मेस्सी प्रोफेशनल फुटबॉलमध्येही नवनवीन विक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. आणि मैदानावरील विक्रमांबरोबरच त्याच्या कराराच्या मोठ्ठाल्या रकमाही चर्चेत असतात.
त्याच्या जोरावर 35 वर्षीय मेस्सीने आतापर्यंतच्या आयुष्यात तब्बल 4948 कोटी रुपये इतकं आहे. मार्च 2016मध्ये मेस्सीने रियल माद्रिद टीमबरोबर तब्बल 500 दशलक्ष युरोज चा करार केला होता. हा करार करताना त्याने बार्सिलोना हा आपला जुना क्लब सोडला. तेराव्या वर्षी मेस्सीने बार्सिलोना क्लबशी करार केला होता. पण, 2016मध्ये बार्सिलोना सोडताना त्याने पैशाचं कारण दिलं होतं.
मेस्सीकडे जगातल्या चार देशांमध्ये मिळून 234 कोटी रुपयांची घरं आहेत. यातलं सगळ्यात मोठं घर स्पेनच्या इबिझा बेटावर आहे. आणि घराची किंमत 97 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या घरात तो सुटीसाठी जातो. तो राहात असलेला बंगला बार्सिलोना शहरात आहे. या बंगल्याची किंमत जवळ जवळ 56 कोटी रुपये आहे. आणि या घरात इतर सोयींप्रमाणेच एक छोटं फुटबॉल ग्राऊंडही आहे. बार्सिलोना टीमबरोबर मेस्सी 17 वर्षं करारबद्ध होता. तेव्हाच त्याने हे घर विकत घेतलं. याशिवाय अमेरिकेत मियामी आणि त्याचा मायदेश अर्जेंटिनातही त्याचे बंगले आहेत.
लियोनेल मेस्सी आपली बालपणीची मैत्रीण रोकुझो हिच्याबरोबर लिव्ह-इनमध्ये राहतो. आणि दोघांना तीन मुलं आहेत. मेस्सी कुटुंब त्यांच्या आलीशान सुट्यांसाठी ओळखलं जातं.
घरांबरोबरच लियोनेल मेस्सी त्याच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांमुळेही चर्चेत असतो. अव्वल कार कंपन्यांनी खास मेस्सीसाठी बनवलेल्या बारा लिमिटेड एडिशन गाड्या त्याच्याकडे आहेत. आणि यात आघाडीवर आहे 300 कोटी रुपयांची फेरारी कार. त्याच्याकडे असलेल्या एकूण कारची किंमतही 412 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जातं.