फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (FIFA World Cup Final) अर्जेटिना (Argentina National Team) गेल्यानंतर ट्विटरवर (Teitter) असे फोटो सगळीकडे फिरतायत. कुणाचं काय, तर कुणाचं काय? असं वाटणारे हे फोटो आहेत. अर्जेंटिनाचा झेंडा आणि भारतातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँंक ऑफ इंडियाच्या पासबुकचा रंग सारखाच आहे. आणि म्हणून हे फोटो सगळीकडे फिरतायत.
अर्जेंटिनाच्या राष्ट्रध्वजावर (Argentina National Flag) दोन निळ्या पट्ट्यांच्या मध्ये एक पांढरी पट्टी आहे. आणि पांढऱ्या पट्टीवर पिवळ्या रंगाचा सूर्य आहे. तर एसबीआय बँकेच्या पासबुकवर फिक्या निळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांमध्ये पांढरा पट्टा आहे. आणि त्यावर आहे स्टेट बँकेचा लोगो.
बस्स! हे साम्य पाहून सोशल मीडिया वापरणारी तमाम तरुण जनता एसबीआयचं पासबुक व्हायरल करत आहे. या ट्विट्समध्ये लिहिलेले संदेशही मजेशीर आहेत. उदाहरणादाखल, हे काही संदेश बघा,
‘म्हणून भारतीय अर्जेंटिनाला सपोर्ट करतात!’
‘फुटबॉलमध्ये पेनल्टी टाईम, तसा एसबीआयचा लंचटाईम’
‘एसबीआय आहे अर्जेंटिनाचा सगळ्यात जुना फॉलोअर’
‘अर्जेंटिना हरली तर भारतीयांचे सगळे पैसेही जातील!’
असे मजेशीर संदेश ट्विटरवर सध्या फिरतायत. आणि अशा ट्विट्सना लाईक्सही हजारांच्या घरात आहेत.
यातला गमतीचा भाग सोडला तरी खरंच भारतात लियोनेल मेस्सीचे समर्थक संख्येनं खूप जास्त आहेत. आणि मेस्सीची अर्जेंटिना टीम फायनलला पोहोचल्यामुळे भारतातही फुटबॉल फायनलकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यातच 35 वर्षीय मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे. तसं सुतोवाच त्याने मीडियाशी बोलताना सेमी फायनलनंतर केलेलं आहे.