Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022 Opening Ceremony : फिफा वर्ल्ड कप उद्घाटन सोहळ्यातून बहुसंस्कृतीचे दर्शन घडणार

FIFA World Cup 2022, FIFA World Cup Opening Ceremony

Image Source : www.vpnsports.com

FIFA World Cup 2022 Opening Ceremony :फिफा विश्वचषक 2022 या वर्षी कतार येथे होणार आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कतारने खास कार्ड जारी केले आहे. मध्य-पूर्वेत होणारा हा पहिला मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आहे. 20 नोव्हेंबर 2022 पासून FIFA वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

फिफा विश्वचषक 2022 या वर्षी कतार येथे होणार आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कतारने खास कार्ड जारी केले आहे. मध्य-पूर्वेत होणारा हा पहिला मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आहे. 20 नोव्हेंबर 2022 पासून FIFA वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यंदा ऑलिम्पिक स्टाईल उद्घाटन होत असलेला पहिला फिफा वर्ल्ड कप अशी ओळख यंदाच्या फिफा वर्ल्ड कपला मिळाली आहे. प्रसिद्ध क्रिएटिव्ह डायरेक्टर मार्को बालिच यांनी वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याचे खास प्लॅनिंग केले आहे. ( FIFA World Cup 2022 Opening Ceremony on 20th Nov 2022)

अनेक ऑलिम्पिक उद्घाटन आणि समारोप सोहळ्यांच्या उद्घाटन सोहळ्यांचा अनुभव असलेले क्रिएटिव्ह डायरेक्टर मार्को बालिच यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी चालणाऱ्या 30 मिनिटांच्या ओपनिंग शोसाठी मागील वर्षभरापासून तयारी सुरु होती. कतारमधील Al-Bayt Stadium येथे हा सोहळा रविवारी 20 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात कोरियन पॉप सिंगर Jung Kook मुख्य आर्कषणाचा केंद्रबिंदू असेल. 

ऑगस्टमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ची सुरुवात एक दिवस पुढे ढकलण्याचे प्रमुख कारण म्हणजे वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याला जास्तीत जास्त प्रमुख व्ह्यूइंग स्लॉट देणे हे होते. कतारमध्ये पार पडत असलेल्या फिफा वर्ल्डकप उद्घाटन सोहळ्यात स्थलांतरित कामगारांना मिळणारी वागणूक, मानवी हक्क यावर चिंता व्यक्त करणारी थिम दाखवली जाणार आहे.   

कतार सरकारच्या कठोर सूचना

इटालियन असलेल्या बालिचने 2002 सालच्या सॉल्ट लेक सिटी गेम्समध्ये आपल्या ऑलिम्पिक अनुभवाची सुरुवात ट्युरिनला फ्लॅग हॅन्डओव्हर करण्याच्या सोहळ्याने केली. 2006, 2014, 2016 आणि 2020 च्या ऑलिंपिकसाठी अनुक्रमे ट्युरिन, सोची, रिओ दी जनेरिओ आणि टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी त्याने तयार केलेल्या पूर्ण समारंभांच्या विद्ध उद्घाटन सोहळा पार पाडण्यासंबंधी कठोर सूचना बालिचला कतारचा सत्ताधारी अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी दिल्या होत्या.  

बहुसंस्कृतीचे दर्शन घडवणारा नेत्रदिपक सोहळा

या शोचा संदेश आणि आशय देशाच्या नेतृत्वाने वैयक्तिकरित्या तयार केला आहे," असे बालिच यांनी सांगितले. कतारला या उद्घाटन सोहळ्यात बहुसंस्कृतीबद्दल बोलायचे आहे, विविधता स्वीकारायची आहे आणि शांततेचे व्यासपीठ व्हायचे आहे. कतार या उद्घाटन सोहळ्यावर अमाप खर्च करण्यास तयार आहे असे सांगून बालिच पुढे म्हणाले की, "आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक आणि प्रकाश तंत्रज्ञांसह 900 लोकांची टीम आहे. "मला वाटते की विश्वचषकाच्या इतिहासाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असेल आणि अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये होणाऱ्या पुढील वर्ल्डकप साठीच्या उद्घाटन सोहळ्यांसाठी अनुभव आणि ओळख समृद्ध करणारा हा मोठा शो तयार करण्याचे आव्हान असेल."