Cristiano Ronaldo: रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासरसोबत केलेला हा करार फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी इतका महागडा करार कधीच करण्यात आला नव्हता. पण महागडा करार का करण्यात आला, याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
सौदी अरेबियात फुटबॉलचा बोलाबाला
सौदी अरेबिया देशात फुटबॉलचा बोलाबाला दिसून येतो. या देशातील नागरिक या खेळासाठी पूर्णपणे क्रेझी आहे. तिथे मोठया प्रमाणात या खेळाचे मॅचेस पाहिले जातात. विशेष म्हणजे कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup) फुटबॉल स्पर्धेत सौदी अऱेबिया व अर्जेंटिनाचा सामना होता, त्यावेळी हा रंजक सामना देशातील प्रेक्षकांना पाहता, यावा यासाठी येथील सरकारने मंत्रालय, सरकारी कार्यालये, शाळा, महाविदयालये यांनी सुट्टी जाहीर केली होती. आणखी खास म्हणजे या सामन्यामध्ये सौदी अरेबिया बलाढय अर्जेटिनाला नमवून हा सामना जिंकली होती. सौदीने हा सामना जिंकल्यानंतर किंग सलमानने पुढील दिवशी ही सुट्टीची घोषणा केली होती. या विजयाचा आनंद फक्त सौदीच साजरा करत नाही तर संपूर्ण अरब देश या विजयाचा उत्साह साजरा करतात.
2030 ची तयारी
कतार येथील फिफा फुटबॉल वर्ल्डकप दरम्यान सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी खूप वेळा फिफाचे प्रमुख जी.व्ही. इन्फॅन्टिनो यांची भेट घेतली. 2016 मध्ये सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत खेळांना अव्वल स्थान दिले आहे. या व्हिजननुसार तीन लक्ष्य ठरविण्यात आले आहे. जसे की, 2030 पर्यंत खेळामध्ये लोकांचा सहभाग 30 ते 40 टक्के वाढविणे, परदेशात सौदी खेळाडूंची कामगिरी सुधारणे, खेळाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे. विशेष म्हणजे या देशातील फुटबॉल खेळाचे वार्तांकन करणारे पत्रकार उरी लेव्ही यांनी एका पोस्टच्या माध्यामातून सांगतिले की, रोनाल्डो सौदी अरेबियात खेळणे हे मोठा बदल घडवून आणण्याचे संकेत आहे.