FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला, तेव्हापासून संपूर्ण जगात लेओनेल मेस्सी (Lionel Messi) ची क्रेझ आणखी वाढली आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघ हा जेव्हा आपल्या मायदेशी पोहोचला, तेव्हा त्यांचे तिथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मेस्सीच्या यशाबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहे. मात्र अर्जेंटिना सरकार तेथील नोटांवर मेस्सीचा फोटो छापणार ही बातमी अधिक लक्ष वेधत आहे. ही बातमी किती सत्य आहे हे पडताळून पाहुयात.
अर्जेंटिनाच्या नोटांवर मेस्सीचा फोटो
फिफा वर्ल्डकपमधील या ऐतिहासिक विश्वचषकाच्या विजयाला चिन्हांकित करण्यासाठी अर्जेंटिनाच्या सेंट्रल बॅंकेच्या सदस्यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लिओनेल मेस्सीचा फोटो नोटांवर छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाहता, पाहता ही बातमी लोकांपर्यंत येऊन पोहोचली. मग या चर्चेला एक उधाण आले. ही चर्चा काही थांबायचे नाव घेईना. हे चित्र पाहता लगेच अर्जेटिना सेंट्रल बॅंकेच्या सदस्यांनी चलनावर मेस्सीचा फोटो छापण्याचा निर्णय मस्करीत प्रस्तावित केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
नोटांवरचा फोटो सोशलमिडीयावर व्हायरल
मेस्सीचा फोटो नोटांवर छापला जाणार ही चर्चा लोकांमध्ये येऊन पोहोचताच, चाहत्यांमध्ये एक झुंबड उडाली. मेस्सीच्या चाहत्यांनी नुसती कल्पनाच केली नाही, तर लिओनेल मेस्सीचे फोटो डिझाइन करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. वादळाप्रमाणे ही बातमी सोशलमिडीयावरून संपूर्ण जगात पसरली.पहा ना, विश्वचषक जिंकण्याच्या आनंदात प्रत्येक देशाला मोठा मान मिळतो. विविध पध्दतीने त्या त्या देशातील खेळाडूंचे स्वागत केले जाते. मात्र अशा प्रकारचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळते. असो, पण मस्करी का असेना, अशा प्रकारचा सन्मान पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.