जगभरात विविध खेळांच्या स्पर्धा होत असतात. फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ जगभरात प्रसिद्ध आहेत. या स्पर्धांमध्ये कोट्यवधींची बक्षिसे वाटप केली जातात. खेळाडूही अनेक पैसे कमावतात. काही प्रेक्षक लाखोंची तिकिटे खरेदी करुन या स्पर्धा पाहायला जातात. फिफा, फॉर्म्युला वन, विंबल्डन या स्पर्धांमध्येही कोट्यवधींची बक्षिसे दिली जातात.
5) बेसबॉल वर्ल्ड सिरीज (Major League Baseball)
वर्ल्ड सिरीज (MLB) ही एक जागतिक पातळीवरील बेस बॉल स्पर्धा आहे. अमेरिकेतली या स्पर्धेची बक्षीस रक्कम संपूर्ण जगाचे लक्ष वेधते. या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम पुर्व नियोजित नसते. 2018 च्या स्पर्धेतील हंगामात 31.7 दशलक्ष डॉलर्स हा सर्वाधिक बक्षीस रकमेचा विक्रम मोडीत काढून 2022 च्या हंगामात बोस्टन रेड सॉक्स (Bostan Red Sox) या संघाने 35 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम जिंकली
4) विंबल्डन (Wimbledon)
dknation.draftkings.com
विंबल्डन ही सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. ही स्पर्धा दरवर्षी जूनच्या शेवटी व जुलै महिन्याच्या सुरुवातीला खेळवली जाते. ही स्पर्धा 19 सदस्यीय मंडळाच्या नेतृत्वात खेळवली जाते यात लॉन टेनिस असोसिएशन (LTA) या संस्थेचा समावेश आहे. 2022च्या विंबल्डन पुरस्काराची रक्कम 40.3 मिलियन इतकी होती.
3) फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup)
www.popsci.com
फिफा फुटबॉल विश्वचषक ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी विश्वचषक स्पर्धा आहे. प्रत्येक हंगामात ही स्पर्धा सर्वाधिक दर्शकांचे विक्रम मोडत असते. हा वर्ल्ड कप दर चार वर्षांनी 32 संघांमध्ये खेळला जातो. 2022 ची फिफा स्पर्धा अर्जेंटिना देशाने जिंकली. या वर्षी फिफा विश्वचषकात 35 मिलियन डॉलर्स ही रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
2) UEFA चँपियन्स लीग
UEFA ही युरोपमधील एक लोकप्रिय स्पर्धा आहे. ही स्पर्धा फुटबॉल या खेळातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्पर्धा आहे मात्र फिफा वर्ल्ड कपपेक्षा या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम अधिक आहे. 2022 मध्ये या स्पर्धेतील विजेत्या संघाला 86 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
1) फॉर्म्युला वन (Formula one)
फॉर्म्युला वन ही सिंगल-सिटर करा रेसिंग मधील एक प्रतिष्ठित कार रेसिंग आहे. फॉर्म्युला वन या स्पर्धेतून लुईस हॅमिल्टन याने सर्वाधिक कमाई केली आहे. फॉर्म्युला वन या स्पर्धेतील मागील हंगामात 100 मिलियन डॉलर्स इतकी भरगोस रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.