Hayya Card for FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 या वर्षी कतार येथे होणार आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कतारने खास कार्ड जारी केले आहे.त्याचे नाव हया कार्ड असून त्याला Fan ID असेही म्हटले जात आहे. फिफा विश्वचषकातील कोणताही सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. हे कार्ड आणि सामन्याची तिकिटे असल्यासच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी वेगळ्या कार्डची आवश्यकता नसून सर्व सामन्यांसाठी फक्त एकच कार्ड वैध असेल. सौदी अरेबियाने सुद्धा हय्या कार्डला मान्यता दिली आहे.
हय्या कार्ड म्हणजे काय? (What is Hayya Card)
हय्या कार्ड हे कतार सरकारने जारी केलेले एक दस्तऐवज आहे. हे कार्ड फक्त फिफा वर्ल्डकपसाठी बनवण्यात आले आहे. जर कोणाला कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्याकडे हे कार्ड आणि तिकीट असणे आवश्यक आहे. हे कार्ड फिफा वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांसाठी वैध आहे. थोडक्यात ज्या कोणीही हे कार्ड घेतले आहे त्याला एकाच कार्डवर फिफा वर्ल्डकपचा आनंद लुटता येणार आहे. थोडक्यात ज्यांच्याजवळ हय्या कार्ड आहे त्यांना कतारसाठी व्हिसा असण्याची गरज नाही.
हय्या कार्डने मिळणार सौदी अरेबियाचा व्हिसा (Hayya Card holders will get Visa of Saudi Arabia)
विशेष म्हणजे सौदी अरेबियानेसुद्धा कतारच्या हया कार्डला समर्थन दिले आहे. सौदी अरेबियाने फिफा वर्ल्डकप २०२२ च्या चाहत्यांसाठी मल्टी-एन्ट्री-व्हिजिट-व्हिसा उपलब्ध करून दिला आहे. सौदी अरेबियाचा मल्टी-एन्ट्री-व्हिजिट-व्हिसा हा आता कतारच्या हया कार्डसोबत जोडण्यात आला आहे. त्यामुळे सौदी अरेबियाचा हा व्हिसा हया कार्ड घेणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध असणार आह. ह्या व्हिसामुळे तुम्हाला सौदी अरेबियामध्ये 60 दिवस राहता येईल. या दरम्यान तुम्ही कितीही वेळा कतार मधून ये-जा करू शकता. त्याला कोणतीही कालमर्यादा नाही. त्याचप्रमाणे मेडिकल इन्शुरन्स घेण्यासाठी सुद्धा हे कार्ड उपयोगी ठरणार आहे. त्याचप्रमाणे हया कार्ड असणाऱ्यांना खेळाच्या दिवशी मेट्रो आणि बस मधून फ्री ट्रॅव्हल करता येणार आहे.
लहान मुलांसाठीही हय्या कार्ड गरजेचं (Child required Hayya Card)
ज्यांना फिफा वर्ल्डकपचा घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी हय्या कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. लहान मुलांनासुद्धा हय्या कार्ड असणे गरजेचे आहे. १८ वर्षांच्या कमी वयाच्या मुलांसोबत त्यांचे पालक सोबत असणे आवश्यक आहे. हय्या कार्डधारकांना जानेवारी 2023 पर्यंत कतारमध्ये मुक्काम करता येणार आहे. कतारमधील स्थानिकांना तीन दिवसांत तर परदेशी नागरिकांना पाच दिवसांत हय्या कार्ड इश्यू केले जाणार आहे.