• 28 Nov, 2022 17:58

FIFA 2022 Ticket Cost : फिफा वर्ल्ड कपमध्ये तिकीटांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क

FIFA World Cup 2022,  FIFA World Cup Ticket Cost

Image Source : www.insidesport.in

FIFA 2022 Ticket Cost: प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या बकेट लिस्टमध्ये असणारी गोष्ट म्हणजे वर्ल्डकप जवळून पाहणे. यंदा कतारमध्ये फिफा वर्ल्डकप पार पडत आहे. मध्यपूर्वेतील हा पहिला अरब देश आहे ज्याने स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी स्विकारली आहे. आणि नेत्रदिपक कामगिरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या बकेट लिस्टमध्ये असणारी गोष्ट म्हणजे वर्ल्डकप प्रत्यक्ष स्टेडियमध्ये उपस्थित राहून पाहणे. यंदा कतारमध्ये फिफा वर्ल्डकप होणार आहे. मध्यपूर्वेतील हा पहिला अरब देश आहे ज्याने स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी स्विकारली आहे आणि नेत्रदिपक कामगिरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वर्ल्ड कपच्या तिकिटांची किंमत किती? (How much Cost of Ticket)

कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समर्थकांना चार प्रकारची तिकिटे उपलब्ध करुन देण्यात आली, तसेच अपंग व्यक्तींसाठी विशेष तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
श्रेणी 1 ही सर्वात जास्त किंमतीच्या तिकीटांची आहे, या तिकीटामुळे स्टेडियममधील मुख्य भागातून सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. श्रेणी 2 आणि श्रेणी 3 ही स्टेडियममधील बसण्याची जागा आहे. येथून प्रिमियम श्रेणीतून सामना पाहता येणार आहे. श्रेणी 4 ही स्टेडियममधील एक बसण्याची जागा आहे जी केवळ कतारमधील रहिवाशांसाठी आरक्षित आहे. कतारचे रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय चाहत्यांना कतारच्या रियालमध्ये सर्व तिकिटे विकली जातात, ज्याच्या किंमती 40 रियाल ते 5,850 रियाल (11 ते 1,607 डॉलर्स) इतकी आहे. भारतीय चलनात तिकिटाची किंमत किमान 902 रुपये  ते कमाल 1,31,774 रुपये इतकी आहे.

वर्ल्ड कपची सर्वात स्वस्त आणि महागडी तिकीटे

प्रत्यक्षात स्टेडिअममध्ये वर्ल्डकप पाहू इच्छिणाऱ्यांसाठी कतारमध्ये 4 श्रेणींमध्ये तिकीटांचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये स्वस्त आणि महागड्या तिकीटांमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. इक्वाडोरबरोबरच्या यजमानांच्या 'अ' गटातील लढतीसाठी सलामीच्या सामन्याची तिकिटे 200 रियाल (भारतीय 4,510 रुपये) स्वस्तात विकली गेली असून, इतर गट सामन्यांच्या तिकीट्स या 40 रियाल (भारतीय 902 रुपये) ते 800 रियाल (भारतीय 18,040 रुपये) पर्यंत आहेत.

16 सामन्यांच्या राउंडसाठी 70 रियाल (1,558 रुपये) ते 1,000 रियालपर्यंत (भारतीय 22,550 रुपये) तिकीटांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या तिकीटांची किंमत ही 300-1,550 रियाल (6,765 रुपये ते 34,932 रुपये) आणि उपांत्य फेरीच्या तिकीटांची किंमत ही 500-3,480 रियाल (11,234 रुपये ते 78,392 रुपये) आहे. अंतिम फेरी पाहणाऱ्या फुटबॉलच्या चाहत्यांना प्रिमिअम श्रेणीतून सामना पाहताना 750 रियाल (भारतीय 16,892 रुपये) तर कॅटेगरी 1 मधून सामना पाहणाऱ्यांसाठी 5850 रियाल ( 1,31,774 रुपये) मोजावे लागणार आहेत.

कुठे खरेदी कराल वर्ल्ड कपची तिकिटे? Where to buy World Cup tickets?

फिफाच्या तिकीट पोर्टलद्वारे चाहत्यांसाठी मर्यादित उर्वरित तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मागणीनुसार स्पर्धा सुरू होईपर्यंत तिकिटे विकली जाऊ शकतात अशी पुष्टी नियामक मंडळाकडून देण्यात आली आहे. वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही सामन्याला उपस्थित राहण्यापूर्वी सर्व चाहत्यांना 'हय्या (फॅन आयडी)' कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे.  कतारमधील कोणत्याही स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी सामन्याचे तिकीट आणि हय्या कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

विश्वचषक 2022 ची तिकिटे अजूनही उपलब्ध आहेत का? Are tickets still available for World Cup 2022?

फिफाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कतार 2022 ची तिकीट विक्री (ऑगस्ट 2022 पर्यंत) 2.45 दशलक्षाहून अधिक झाली आहे. या आकडेवारीत जुलै ते ऑगस्ट दरम्यान 5,20,532 एवढ्या तिकीट  विक्रीचा समावेश आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपूर्वी तिकीट विक्रीचा अंतिम आकडा 2.8 दशलक्षा पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.