Cristiano Ronaldo: काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासार कल्बसोबत सर्वात मोठा करार केला आहे. हा करार फुटबॉल विश्वातील सर्वाधिक महागडा करार असल्याचे सांगितले जात आहे. या करारसाठी त्याने तब्बल 1800 कोटी घेतले असल्याची माहिती आहे. चर्चा होते ना, होते... तेवढयात तो सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या रूमची किंमत व त्या हॉटेलचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात, त्या हॉटेलचे नाव, त्याच्या रूमची किंमत.
हॉटेलचे नाव व किंमत (Hotel Name and Price)
फुटबॉल विश्वातील सर्वाधिक महागडा करारा झाल्यानंतर, रोनाल्डो आता सौदी अरेबियातील रियाध या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहतो. त्या हॉटेलचे नाव होटल ‘फोर सीजन्स’ (Four Seasons Hotel) असे आहे. हे हॉटेल 3000 फूट उंचावर त्याची रूम असून, त्याचे भाडे तब्बल 250,000 पाउंड (2.5 करोड़ रूपयांपेक्षा ही अधिक) आहे. हे भाडे दरमहा आकारले जाणार आहे.
रोनाल्डोची संपत्ती (Ronaldo's Wealth)
फोर्ब्सच्या मते, मागील वर्षी मे महिन्यापर्यंत, रोनाल्डोची एकूण संपत्ती 115 मिलियन डॉलर होती. भारतीय रुपयात पाहिले तर ते 946 कोटी रुपये इतकी होते. एका वेबसाइट्सनुसार, रोनाल्डोची एकूण संपत्ती सुमारे 490 मिलियन डॉलर आहे. रोनाल्डो एका सामन्यासाठी सुमारे 6 करोड डॉलर्स घेतो. त्याच वेळी, त्याला प्रत्येक जाहिरातीसाठी 5.5 करोड डॉलर मिळतात. रोनाल्डो सध्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. निव्वळ संपत्तीच्या बाबतीत, अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स त्याच्या पुढे आहेत. फ्रांसमध्ये दोन आठवडयापूर्वीच रोनाल्डोने एक हॉटेल सुरू केले आहे. त्याने या आपल्या हॉटेलचे नाव रोनाल्डोचा म्हणजेच स्वत:चा जर्सी नंबर सीआर 7 असे दिले आहे. रोनाल्डो म्हणतो, मला वाटत नाही की, मी इतक्या कमी वयात म्हणजे वयाच्या फक्त 31 वर्षी हॉटेलचा मालक बनेल. मला खरचं या गोष्टीचा खूप आनंद होत आहे.