Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA WORLD CUP 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाने ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली मोठी वाढ!

Shares Made A Big Jump in The Football World Cup!

फिफा वर्ल्डकपमध्ये अटातटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या हिरोने केलेला एक एक गोल ठरत होता, एका कंपनीसाठी अधिक फायदेशीर. ही कोणती कंपनी आहे, ते आपण खालील लेखाव्दारे जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup Final) अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) बाजी मारून जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल 36 वर्षांनंतर या टीमने फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup Final 2022) जिंकला आहे. या विजयाचा हीरो ठरला आहे लिओनेल मेस्सी (Lionel Messi). या हिरोने केलेला एक एक गोल ठरत होता एका कंपनीसाठी अधिक फायदेशीर. ही कोणती कंपनी आहे, ते आपण आता जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्डकपमध्ये कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये झाली वाढ?

फिफा वर्ल्डकप फुटबॉल (FIFA World Cup Final) अटातटीच्या सामन्यात विजय अर्जेंटिनाचा (Argentina) पण फायदा झाला तो आदिदास (Adidas) कंपनीचा. कारण या कंपनीचे टी-शर्ट घालून अर्जेंटिना मैदानात उतरली होती. या टीमने विजय आपल्या नावावर केल्यावर आदिदासच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. या कंपनीच्या शेअर्समध्ये 1.93 टक्क्यांनी वाढ होऊन युरो 121.30 (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) वर बंद झाले.

शेअर्स वाढीसाठी वर्ल्डकपचा झाला मोठा फायदा How FIFA Helped 'This' Company's Shares

आदिदासच्या शेअरमध्ये वर्ल्डकपपूर्वी शेअर्समध्ये घसरण झाली होती. मात्र साधारण वर्ल्डकप दरम्यान मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही वाढ देखील कमी कालावधीत झाली आहे. 3 नोव्हेंबरनंतर या कंपनीच्या शेअर दरात 28 टक्क्यांवरून जास्त वाढ झाली आहे.

विक्रीचा परिणाम थेट शेअरवर Increase in Sale, So Increase in Share Price

फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापूर्वी अर्जिंटिनाच्या जर्सीला जगभरातून मोठी मागणी होती. या टी-शर्टची जगभरात अधिक विक्री झाली. एवढेच नाही, तर बॉलीवूड सेलिब्रिटीदेखील या जर्सीमध्ये वावरताना पाहायला मिळाले. कित्येक ठिकाणी या जर्सीचा स्टॉकदेखील संपला होता. अर्थातच वाढलेल्या विक्रीचा सकारात्मक परिणाम थेट शेअर्सवर झाल्याचे दिसले.

आदिदासमुळे झाले नायकीचे नुकसान Adidas's Gain, Nike's Loss

विश्वचषक फुटबॉल सामना जसा रंगत होतो, तसे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष होते आदिदास व नायकीच्या शेअर्सवर. कारण आदिदास अर्जेंटिनाला तर नायकी फ्रान्सला संघाला स्पॉन्सर आहेत. म्हणूनच फ्रान्सच्या टीमचा पराभव झाल्यानंतर नायकी कंपनीच्या शेअरमध्ये 1.96 टक्क्यांची घसरण होऊन 100 यूरोवर पोहोचला.