कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकामधून जागतिक फुटबॉल संघटनेने घसघशीत कमाई केली आहे. फिफाने 2022 वर्ल्ड कपच्या चार वर्षांच्या व्यावसायिक सौद्यांमध्ये 7.5 अब्ज डॉलर्सची विक्रमी कमाई केली आहे. फिफाने नुकतेच वर्ल्ड कपमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती जाहीर केली. रशियात 2018 मध्ये झालेल्या विश्वचषकाशी संबंधित आधीच्या व्यावसायिक सौद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न 1 अब्ज डॉलरने अधिक आहे.
वर्ल्ड कप यजमान देशाशी झालेल्या व्यावसायिक सौद्यांमुळे अतिरिक्त उत्पन्नाला चालना मिळाली. या मेगा इव्हेंटसाठी ‘कतार एनर्जी’ एक उच्च-स्तरीय प्रायोजक म्हणून सामील झाली आणि नवीन तृतीय-स्तरीय प्रायोजकांमध्ये कतारची बँक क्यूएनबी आणि दूरसंचार कंपनी ओरेडू यांचा समावेश आहे. फिफाने या वर्षी फायनान्शिअल प्लॅटफॉर्म crypto.com आणि ब्लॉकचेन स्पॉन्सर्सकडून दुसऱ्या-स्तरीय प्रायोजक करारांची देखील भर घातली आहे. रशिया आणि कतार स्पर्धांचा समावेश असलेल्या दोन स्पर्धांच्या करारांमध्ये सेप ब्लॅटर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत यंदाच्या विश्वचषकासाठी प्रमुख प्रसारण करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. त्यामध्ये अमेरिकेतील फॉक्स आणि 2011 पासून कतारचे प्रसारक बीआयएन स्पोर्ट्स यांच्याशी झालेल्या करारांचा समावेश होता.
कोविड- 19 महामारीनंतर महसूल वाढणार (Income Rise in Pandemic)
कोविड-19 महामारी असूनही फिफाचा महसूल सुमारे 2.5 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये जेव्हा राष्ट्रीय संघ फुटबॉल आणि विश्वचषक पात्रता सामने जवळजवळ पूर्णपणे बंद झाले होते तेव्हा फिफाने आणिबाणीतून सदस्यांना मदत करण्यासाठी त्या रोख रकमेचा वापर करण्याची तयारी दर्शविली होती.
महिला फुटबॉल विश्वचषकासाठी स्वतंत्र प्रायोजक करार (Separate Sponsored for Women Football WC)
महिला फुटबॉलसाठी नवे आर्थिक धोरण आणि अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये विस्तारलेल्या 2026 च्या विश्वचषकामुळे पुढील चार वर्षांसाठी महसूल 10 अब्ज डॉलरच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी महिला फुटबॉलसाठी स्वतंत्र प्रायोजक करार केले जात आहेत. 2026 च्या पुरुष स्पर्धेत 32 ऐवजी 48 संघ असतील. फिफाकडे 2026 च्या आवृत्तीसाठी प्रायोजकांची यादी अगदी कोरी असून यामध्ये कोका-कोला, आदिदास आणि वांडा या उच्च स्तरीय प्रायोजकांसह सध्या विस्तारित केलेले एकमेव सौदे आहेत.