Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022 Prize Money : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये बक्षिसांची होणार लूट

FIFA Word Cup 2022, FIFA World Cup Price Money, FIFA, QATAR

Image Source : www.wgoqatar.com

FIFA World Cup 2022 Prize Money : फिफाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून शेवटच्या सामन्यापर्यंत फुटबॉलप्रेमींना अनेक गोष्टींची उत्सुकता असते.त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या संघाला बक्षिसाची किती रक्कम मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते.

कतारमध्ये रविवारी 19 नोव्हेंबर 2022 रोजी फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच एका अरब देशात फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे.फिफाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून शेवटच्या सामन्यापर्यंत फुटबॉलप्रेमींना अनेक गोष्टींची उत्सुकता असते.त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या संघाला बक्षिसाची किती रक्कम मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते.

फिफाच्या माहितीनुसार, कतारमधील वर्ल्ड कप 2022 मध्ये एकूण 440 दशलक्ष डॉलर्स इतक्या बक्षिसांची लूट होणार आहे. 18 डिसेंबरला या मेगा इव्हेंटची फायनल होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 64 सामने खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा 32 संघांमध्ये खेळवली जाणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 2026 च्या विश्वचषकात 48 संघ सहभागी होणार आहेत.

रशियात 2018 साली पार पडलेला फिफा वर्ल्ड कप स्पर्धा जगभरातील 3.572 अब्ज प्रेक्षकांनी पाहिला होता. (2018 World Cup in Russia was watched by a combined 3.57 billion viewers) ही आकडेवारी जगाच्या लोकसंख्येच्या निम्मे होती. फिफाने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामना एकूण 1.12 अब्ज लोकांनी पाहिला.

खालीलप्रमाणे असेल बक्षिसांची वाटणी (FIFA World Cup 2022 Prize Money Breakdown)

चॅम्पियन्स 42 मिलियन डॉलर
उपविजेता30 मिलियन डॉलर
तिसरे स्थान27 मिलियन डॉलर
चौथे स्थान 25 मिलियन डॉलर
पाचवा ते आठवा क्रमांक68 मिलियन डॉलर (प्रत्येक संघामागे 17 मिलियन डॉलर)
नववा ते 16वा क्रमांक104 मिलियन डॉलर (प्रति संघ १३ मिलियन डॉलर)
17वे ते 32वे स्थान144 मिलियन डॉलर (प्रति टीम 9 मिलियन डॉलर)

प्रत्येक संघाला मिळणार 1.5 मिलियन डॉलर्स (Every Team will Get USD 1.5 Millions)

प्रत्येक पात्र संघाला तयारीच्या खर्चासाठी मदत करण्यासाठी स्पर्धेच्या आधी 1.5 मिलियन डॉलर्स देखील मिळणार आहेत. याशिवाय, ज्या क्लबने त्याच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे त्या क्लबला अधिकचे 209 मिलियन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. तसेच फिफाच्या संरक्षण कायद्यानुसार त्या क्लब्सच्या खेळाडूंना या स्पर्धेत दुखापत झाली तर त्यांना 134 मिलियन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. 2018 च्या स्पर्धेतील विजेत्या फ्रान्सला 38 मिलियन डॉलर्सचे पेमेंट मिळाले होते.