दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disaster) शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान होतं. याअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढून पाऊस, गारपीट, वादळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (PMFBY) अंतर्गत, भात, बाजरी, ज्वारी, मका, मूग, गवार, उडीद, तूर, हरभरा, सोयाबीन, तीळ, भुईमूग, कापूस, नाचणी, कांदा अशा विविध पिकांचा विमा काढता येतो.
Table of contents [Show]
अंतिम तारीख 31 जुलै
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियासह (AIC) प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत (PMFBY) खरीप पिकांचा विमा मिळवू शकता. या योजनेअंतर्गत, सर्व शेतकरी जास्तीत जास्त 2 टक्क्यांच्या सवलतीच्या प्रीमियम दरानं खरीप पिकांचा विमा काढू शकतात. यासाठीच्या नोंदणीची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 आहे. नोंदणीसाठी https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया करावी लागणार आहे.
फसल बीमा कराओ, सुरक्षा कवच पाओ!
— Pradhan Mantri Fasal Bima Yojana (@pmfby) July 4, 2023
प्रधानमंत्री फसल बीमा योजना में अपनी फसल का बीमा कराएं और फसलों का भविष्य सुरक्षित बनाएं!
ध्यान रखें - पंजीकरण तिथि से पहले अपने फसल का बीमा कराये और बुवाई से लेकर फसल कटाई तक आर्थिक सुरक्षा पाए।
पंजीकरण करने की अंतिम तिथि 31 जुलाई 2023 है! अधिक… pic.twitter.com/YinC9fUjHB
मागच्या 7 वर्षांपासून योजना सुरू
सरकारनं सुरू केलेली प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) मागच्या 7 वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, कीटक कीटकांमुळे पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देते. सर्व शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या पिकांचा विमा काढून या माध्यमातून आर्थिक सुरक्षा मिळवता येईल.
रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात
दाव्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. 7 वर्षांत जवळपास 48 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. 13.63 कोटींपेक्षा जास्त शेतकरी अर्जांना पीक नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. 1.36 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा दावे अदा करण्यात आले आहेत.
ऐच्छिक योजना
कर्ज काढलेल्या अथवा विना कर्जदार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र ही ऐच्छिक योजना आहे. योजनेसंबंधी ऑनलाइन नोंदणी गरजेची असणार आहे. खरीप पिकांसाठी 31 जुलै तर रब्बी पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. अगदी एक रुपयांपासून हा विमा उपलब्ध असेल. संकेतस्थळावर यासंबंधीची सविस्तर माहितीही उपलब्ध आहे.