Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Benefits of PMFBY : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मिळतात 'हे' लाभ

Benefits of PMFBY

PMFBY 2022: केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजणेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Pradhan Mantri Fasal Bima Yojna: प्रधानमंत्री पीक  विमा योजना 2022 ही केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते तेव्हा त्यांना या परिस्थितीत नुकसान भरपाई दिली जाईल तसेच जे शेतकरी  नापिकीमुळे आत्महत्या (suicide)करत होते, आता सरकारने मदत दिल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2022

भारतातील कृषी विमा कंपनी LIC द्वारे देशातील शेतकऱ्यांसाठी  प्रधानमंत्री पीक  विमा योजना चालवली जाते. पूर, वादळ, पिकांना आग अशा नैसर्गिक आपत्तींमुळे, दुष्काळामुळे, गारपिटीमुळे पिकांची नासाडी होते, त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 8800 कोटींची योजना बनवली आहे. योजनेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि खरीब पिकांसाठी २ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. पिकांचे नुकसान झाले तरच  प्रधानमंत्री पीक  विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता, अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

 • रेशन कार्ड (Ration Card)
 • आधार कार्ड (Aadhar Card)
 • बँक खाते क्रमांक आधार लिंक असलेला 
 • ओळखपत्र (Identification card)
 • पासपोर्ट साईज  फोटो 
 • शेत खसरा क्रमांक
 •  रहिवासी प्रमाणपत्र 
 • शेत भाड्याने घेतले असल्यास शेतमालकाशी केलेल्या कराराची छायाप्रत.
 • ज्या दिवशी शेतकऱ्याने पिकाची पेरणी सुरू केली त्या दिवशीची तारीख

PMFBY चे फायदे 

 • प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यास सरकार शेतकऱ्यांना भरपाई देईल.
 • ही भरपाई सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 2 लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे.
 • यापुढे पीक नापिकीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार नाही. 
 • सरकार शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई (compensation for damages) देईल.
 • अत्यंत कमी व्याजाने शेतकरी कर्जाची परतफेड करू शकतात.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा लोकांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ मिळेल. 
 • जर कोणी स्वतः  पिकांचे नुकसान केले तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2022 ची उद्दिष्टे 

भारत हा कृषीप्रधान देश असल्याने बहुतांश लोक कृषी क्षेत्रात काम करतात, त्यांचे  कुटुंब शेतीवर चालते. आमच्यासाठी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही, भारतातील शेतकरी ज्या प्रकारे आत्महत्या करतात, ते संपवायला हवे जेणेकरुन शेतकरी स्वावलंबी होऊन त्याच्या चिंतेतून मुक्त होऊ शकेल आणि अधिक पिके घेऊन शकतील.  शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन वाढेल, भारत विकासाच्या टप्प्यात अधिक गतिमान होऊ शकेल आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.