Wheat Export: देशात यावर्षी गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादनात होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर(Wheat Export) बंदी घातली होती मात्र, सरकार आता ही बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यासोबत(Farmers) व्यापाऱ्यांचाही मोठा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
निर्यातबंदी कधी हटणार?
गव्हाच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन केंद्र सरकारने(Central Government) मे 2022 मध्ये निर्यातबंदी केली होती. मात्र आता गव्हाचा नवा हंगाम सुरु झाला असून केंद्र सरकार गव्हावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय मार्च-एप्रिलच्या आसपास घेणार असल्याचे परकीय व्यापार महासंचालनालयाचे(DGFT) महासंचालक संतोष कुमार सारंगी(Santosh Kumar Sarangi) यांनी सांगितले आहे.
निर्यात बंदी करण्याचे कारण काय?
भारत जगातील अनेक देशांमध्ये गहू, तांदूळ, चहा, साखर यासारखी उत्पादने निर्यात करतो. परदेशातही गहू मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असून या निर्यातीचा परिणाम असा झाला की भारतातील गव्हाचा साठा कमी झाला. बाजारात गव्हाचा खप कमी झाल्यामुळे भाव वाढू लागले. त्यामुळे सरकारने गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. 2022 मध्ये उष्ण हवामान मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर झाला होता. उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली, तरीही केंद्र सरकारने गव्हाची निर्यात सुरूच ठेवली होती. याच दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचाही गव्हाच्या वापरावर परिणाम झाला. गेल्या काही महिन्यात गव्हाच्या दरात वाढ झाल्यामुळे पीठही महाग झाले होते. अशा विविध कारणामुळे ही निर्यातबंदी करण्यात आली होती, मात्र आता लवकरच ही बंदी उठणार आहे.