Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk

Image Source : www.finance.yahoo.com

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

टेस्ला कंपनीच्या (Tesla Inc) शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे एलॉन मस्क (Elon Musk) यांची मालमत्ता दिवसें दिवस कमी होतेय. आणि जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावरून दूर झाल्यानंतरही त्यांची पिछेहाट अजून थांबलेली नाही.     

एकट्या मंगळवारी (20 डिसेंबर) त्यांच्या संपत्तीत 7.7 अब्ज अमेरिकन डॉलरची घट झाली. हा आकडा ब्लूमबर्गच्या रिअलटाईम इन्डेक्सचा (Bloomberg Realtime Index) आहे. कारण पुन्हा टेस्ला कंपनीच्या (Tesla Inc) शेअरमध्ये झालेली घसरण हेच होतं. 2022 मध्ये मस्क यांच्या संपत्तीत आतापर्यंत एकूण 122 अब्ज अमेरिकन डॉलरची घट झालीय. मस्क यांनी ट्विटर (Twitter Inc) ही सोशल मीडिया (Social Media) कंपनी विकत घेतल्यानंतर मस्क यांच्यासाठी काहीही नीट झालेलं नाही. एकतर मस्क यांनी ट्विटरसाठी मोजलेले 44 अब्ज अमेरिकन डॉलर ही रक्कम अवाजवी होती, असं जाणकारांना वाटतं. आणि त्यासाठी त्यांचा बराच पैसा खर्च झाला. दुसरं म्हणजे ट्विटरचे मालक झाल्यावर त्यांनी घेतलेले काही निर्णय तसंच केलेली वक्तव्य यामुळे अमेरिकन जनमानसात त्यांची प्रतिमाही मलिन झाली आहे. टेस्लाच्या भागधारकांचं तर असं म्हणणं आहे की, मस्क यांचा बहुतांश वेळ ट्विटर कंपनीकडे लक्ष देण्यात जातोय. आणि त्यांचं टेस्ला या मूळ कंपनीकडे लक्ष नाही. आणि या सगळ्याचा परिणाम टेस्लाचे शेअर कोसळण्यात होतो आहे.     

गंमत म्हणजे 2021 मध्ये एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 122 अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली. आणि एकूण मालमत्ता 340 अब्ज अमेरिकन डॉलरवर गेल्यामुळे श्रीमंतांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर अढळ राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.     

पण, आताची घसरण ही त्यांनी गेल्यावर्षी कमावलेल्या पैशापेक्षा मोठी आहे. त्यामुळे एकूण संपत्तीच्या निकषावर मस्क मागच्या दोन वर्षांत पहिल्यांदात 150 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाली गेले आहेत.     

एलॉन मस्क यांचा नफा कमावून देणारा मुख्य उद्योग आहे टेस्ला ही कार कंपनी. इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या या कंपनीचे शेअर गेल्यावर्षी अमेरिकन शेअर बाजारात 450 अमेरिकन डॉलरच्या वर पोहोचले होते. पण, कोव्हिड नंतर इलेक्ट्रिक कारची घटलेली मागणी आणि मस्क यांच्या भोवती निर्माण होणारे वाद यामुळे टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण सुरू होऊन ते 115 अमेरिकन डॉलरच्या पातळीवर येऊन ठेपलेत. आणि त्यामुळे तसंच ट्विटर खरेदीचा अतिरिक्त भार पडल्यामुळे मस्क यांच्य मालमत्तेत ही घट झालीय.