• 27 Mar, 2023 06:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Senior Citizen's Air Travel : व्हील चेअर ते तिकीट दरात सूट; ज्येष्ठ नागरिकांसाठी हवाई प्रवासात 'या' सुविधा उपलब्ध असतात

Senior Citizen's Air Travel

Senior Citizen's Air Travel Facility's: सवलतीच्या तिकिटांपासून ते व्हीलचेअर आणि आरक्षित अटेंडंटपर्यंत, एअरलाइन्स आणि विमानतळ ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा देतात याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या

बहुतेक वृद्ध नागरिक एकट्याने प्रवास करण्यास घाबरतात, विशेषत: जर त्यांना मोठ्या, गर्दीच्या विमानतळावरून हवाई प्रवास करायचा असेल. ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या विमानतळांमध्ये सामान घेऊन फिरताना त्रास होतोच, शिवाय त्यांना प्रवासी म्हणून त्यांचे हक्क आणि त्यांना मिळू शकणार्‍या सुविधांबाबतही माहिती नसते. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना कोणत्या सुविधा उपलब्ध असतात?

विमानतळावरील सुविधा (Airport facilities)

विमान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार, एअरलाइन्स आणि विमानतळांनी ज्येष्ठ नागरिकांना हवाई प्रवास सहाय्य प्रदान करणे आवश्यक आहे ज्यात त्यांच्या पुढील फ्लाइटमध्ये बोर्डिंग, डिप्लॅनिंग आणि कनेक्शनमध्ये सहाय्य समाविष्ट आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मते, विमानतळ, भारतीय वाहक आणि भारतात कार्यरत परदेशी विमान कंपन्या ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग प्रवासी आणि प्रथमच प्रवास करणार्‍यांची सोय करण्यात अयशस्वी झाल्यास दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार आहेत.

"सर्व प्रवासी हे अतिशय महत्त्वाचे, मूल्यवान आणि आदरणीय ग्राहक असल्याने, गैरवर्तन, असभ्य वर्तन आणि छळाची कोणतीही घटना एअरलाइन/विमानतळ ऑपरेटरद्वारे सर्वोच्च प्राधान्याच्या आधारावर हाताळली जाईल आणि DGCA कडे तक्रार केली जाईल," विमान असा विमान वाहतुकीचा नियम आहे.

DGCA च्या मते, एअरलाइन/विमानतळ चालकांनी टर्मिनल बिल्डिंगमधील सर्व ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि अपंग व्यक्तींसाठी विनामूल्य स्वयंचलित बग्गीची व्यवस्था करणे अपेक्षित आहे जेणेकरून ते मोठे अंतर असलेल्या बोर्डिंग गेट्सपर्यंत पोहोचू शकतील. सर्व विमानतळांवर वार्षिक 50,000 किंवा त्याहून अधिक प्रवासी विमानांचे टेक-ऑफ व लॅंडींग होते.

त्याचप्रमाणे, विमानतळ चालकांनी बोर्डिंग गेटपर्यंत हातातील सामानाची वाहतूक करण्यासाठी सुरक्षा तपासणीनंतर लहान ट्रॉली प्रदान करणे अपेक्षित आहे.
विमानतळ चालकांनी प्रवाश्यांना टर्मिनल इमारतींमध्ये स्वयंचलित बग्गी आणि लहान ट्रॉलीच्या उपलब्धतेची माहिती देखील प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास विमान कंपन्या आणि विमानतळ चालकांनी संपर्क कक्षाची उभारणी करणे गरजेचे आहे.

आयडीची असेल आवश्यकता (ID will be required)  

प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक सुविधांचा लाभ कसा घेऊ शकतात? याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात बहुतेक एअरलाइन्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या वेबसाइटवर ज्येष्ठ नागरिकांनी खरेदी केल्यास तिकिटांवर सूट मिळू शकते, परंतु विमानतळावरील सुविधांचा लाभ घेणे थोडे अवघड असते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि आरामदायी विमान प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ आणि नियोजन. विमानतळांवर उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रयत्न करावेत आणि विमान सुटन्याच्या वेळेच्या किमान दीड तास आधी विमानतळावर पोहोचतील याची खात्री करावी.

ज्येष्ठ नागरिकांनी विमानतळ किंवा विमान कंपनीला तिकीट बुक करतांना फोन करून ते कोणत्या सुविधा देतात हे जाणून घ्यावे. विमानतळ किंवा विमान कंपनीशी अगोदर संपर्क साधल्यास ते विमानतळावर सर्व सुविधा कशा मिळवायच्या याबाबत ते  योग्य माहिती देतात.

बर्‍याच विमान कंपन्या त्यांच्या तिकीट काउंटरवर ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर आणि इतर उपयुक्त सुविधा प्रदान करतात.

तुम्हाला जेथे जाण्याची आवश्यकता असेल तेथे चॅपरोन तुम्हाला घेऊन जाईल आणि तुमच्या विमानतळावरील उपस्थिती दरम्यान तो तुमच्यासोबत असेल. टर्मिनलवर पोहोचल्यावर ज्येष्ठ नागरिकांनी आरक्षित वाहन मार्गांचा वापर करावा. अशा मार्गांचे स्थान व मॅप सर्व विमानतळांच्या वेबसाइटवर दिलेले आहेत.