Senior Citizens Free Air Travel: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारद्वारे विविध सुविधा पुरविल्या जातात. रेल्वेपासून बँकांपर्यंत अनेक कामांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळते.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिक मोफत विमानाने प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीनंतर आता विमान प्रवासात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
भारतातील एका राज्य सरकारने ही सुविधा सुरू केली असून, केंद्रासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक प्रकारच्या सेवा याद्वारे दिल्या जाणार आहेत. हे राज्य आहे मध्य प्रदेश! मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली असून त्यामध्ये त्यांना विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा
या योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.मध्य प्रदेशातील भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबल विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
सरकारी खर्चावर होईल ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास
या तीर्थक्षेत्र योजनेत अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकतात.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा
या योजनेला 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा' असे नाव देण्यात आले आहे. वयाची साठी पार केलेल्या नागरिकांनासाठी ही योजना आहे. तसेच इन्कम टॅक्सच्या कक्षेत न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या तीर्थयात्रेत जास्तीत जास्त रेल्वे प्रवास अंतर्भूत केला गेला आहे. ही योजना याआधी जून 2012 मध्ये सुरू करण्यात आली होती. कोविड संक्रमण काळात ही योजना बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली गेली आहे.