Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेताय? जाणून घ्या बँकांचा व्याजदर

Education Loan

तुम्ही जर स्वस्त शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँक जर शोधत असाल, तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. प्रत्येक बँकेचा शैक्षणिक कर्जावरील व्याजदर वेगवेगळा आहे. तुम्हाला परवडेल असा व्याजदर निवडून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करू शकता.

Education Loan Without Collateral: जर तुम्ही तुमचे पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी एज्युकेशन लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या बँकांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण येथे तुम्ही 20 लाखांपर्यंतचे कर्ज सहजपणे घेऊ शकता. या बँकांद्वारे तुमच्याकडून अत्यंत कमी व्याजदर आकारले जातील. शैक्षणिक कर्ज 7 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते. या काळात तुमच्याकडून पैसे आकारले जात नाहीत.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कर्ज भरावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला या बँकांची माहिती असणे आवश्यक आहे.   

या कागदपत्रांची असेल आवश्यकता 

तुमच्याकडे इयत्ता 10वी आणि 12वीचे गुणपत्र (Marksheet) आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतला आहे तिथले प्रवेश पत्र (Admission Letter), फी रचना (Fee Structure) आणि अर्जदाराची केआयसी कागदपत्रे (KYC Documents)

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 

पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक आहे. येथे तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता. पंजाब बँक शैक्षणिक कर्जासाठी 7.15 टक्के व्याज आकारत आहे. परंतु, हा व्याजदर वेळोवेळी बदलत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. या बँकेतून तुम्ही सात वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 

बँक ऑफ बडोदा ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक आहे. देना बँक आणि विजया बँक या बँकेतच विलीन करण्यात आल्या आहेत. येथूनही तुम्ही सहजपणे शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. ही बँक 7.15 टक्के व्याज आकारते आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो रेट बदलला की सर्व बँका कर्जावरील व्याजदरातही बदल करतात. या बँकेत अर्ज करून तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळवू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 

जर तुम्ही सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्जाच्या शोधात असाल, तर तुम्ही एकदा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेला भेट द्या. येथे तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. ही बँक 10.90% इतका व्याजदर देते आहे.