Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Economic Survey 2023: विमा योजनांवर क्लेम पेमेंट वाढले, आयुष्मान विमा योजनांच्या लाभार्थ्यांना फायदा

Economic Survey 2023 government insurance scheme

Economic Survey 2023: आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, विविध सरकारी विमा योजनांमध्ये वेगाने प्रगती नोंदवण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या यशाचे प्रमाण वाढले आहे.

Economic Survey 2023: सामाजिक सुरक्षा कव्हरेजसाठी केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमा योजनांवर दावा भरणा आकडा वाढला आहे, ही माहिती मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आर्थिक सर्वेक्षण 2023 मध्ये दिली आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या यशाचे प्रमाण वाढले असून लाभार्थ्यांना विम्याची रक्कम भरण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकांमधील आर्थिक समावेश वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये विम्याचा स्वीकार आणि प्रवेश वाढण्यास मदत झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, विविध सरकारी विमा योजनांमध्ये वेगाने प्रगती नोंदवण्यात आली आहे.

आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme)

आयुष्मान भारत योजना ही वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना प्रति वर्ष 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. या योजनेत, 2018 पासून, 19.7 कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. 20 जानेवारी 2023 पर्यंत, 13 हजार 115 खाजगी रुग्णालयांसह 28 हजार 667 सूचीबद्ध आरोग्य सेवा प्रदात्यांच्या नेटवर्कद्वारे रूग्णांच्या उपचारांसाठी 0.49 लाख कोटींहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी 4.3 कोटींमधून ही रक्कम देण्यात आली.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Scheme)

प्रधानमंत्री वय वंदना योजना सरकारी हमीच्या आधारावर सबस्क्रिप्शन रकमेशी निगडीत खात्रीशीर पेन्शन/परताव्याच्या तरतुदीद्वारे योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा प्रदान केली जाते. याअंतर्गत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 8.6 लाख सदस्यांना या योजनेचा लाभ मिळाला. योजना 2017 पासून सुरू होऊन, या योजनेच्या सदस्यांनी एकूण 84 हजार 659.4 कोटी रुपये जमा केले होते.

पंतप्रधान विमा योजना (Prime Minister's Insurance Scheme)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत, लाभार्थ्यांना अपघाती मृत्यू आणि एकूण अपंगत्वासाठी 2 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्वासाठी 1 लाख रुपयांचे जोखीम संरक्षण प्रदान केले जाते. 2015 पासून, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 31.3 कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत लाभार्थ्यांना 1.07 लाख रुपयांचे दाव्याचे पेमेंट करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास धारकाच्या बचत बँक खात्यात 2 लाख रुपयांचे जोखीम कव्हरेज जमा केले जाते. 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू झाल्यापासून, 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 14.4 कोटी लाभार्थी या योजनेत नोंदणीकृत झाले आहेत आणि 6.3 लाख दावे अदा करण्यात आले आहेत.