Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Invest Money Wisely : मेहनतीचा पैसा गुंतवताना या 10 गोष्टी विसरू नका

Investment

Invest Money Wisely : आपण आयुष्यात फार कष्टाने पैसे कमावतो. तेव्हा त्यातील काही पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे फार गरजेचे आहे. कारण गुंतवणूक केली नाही तर, आपले पैसे वाढणार नाही. त्यातही जर का आपण स्मार्ट गुंतवूक केली तर आपण आपल्या भविष्यातील अनेक उद्दीष्टे साध्य करु शकतो.

Investing Your Hard Earned Money : कोणतीही गुंतवणूक ही योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. आपला गुंतवणूक करण्याचा मार्ग जर का चुकला, तर आपल्या कष्टाने कमावलेल्या गोष्टींचे नुकसान होऊ शकते. गुंतवणूक कशी करावी? याबाबत तज्ञांकडून अनेक सल्ले दिले जातात. परंतु आपल्या जीवनातील ध्येय आणि आकांक्षा यानुसारच आपण गुंतवणूक केली पाहिजे.

वेळ महत्त्वाचा

गुंतवणूक करतांना वेळ महत्वाचा असतो. अनेकदा असे होते की, आपण दोन ते तीन वर्षांपासून आपली योजनाच आखत असतो. आणि ती अंमलात येई पर्यंत योग्य वेळ निघुन गेलेली असते. अनेकदा यामुळे आपल्याला योग्य परतावा मिळत नाही.

काही प्रमाणात जोखीम स्विकारा

पूर्णपणे जोखीममुक्त असणारी अशी कुठलीही गुंतवणूक नाही. कुठलीही गुंतवणूक करतांना त्यातील धोके पूर्णपणे समजावुन घेणे गरजेचे आहे. गुंतवणूक करतांना आपण सतत नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहीजे. जेणे करुन वेळेनुसार आपण स्वत:ला आणि आपल्या पैश्यांना अपडेट करु शकु.

गुंतवणूक विविध ठिकाणी करा

गुंतवणूक करतांना ती विविध गोष्टींमध्ये करायला हवी. विविध मालमत्ता,  पॉलिसी आणि म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया म्हणजे विविधीकरण होय. विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यास, कुठल्याही नुकसानीची जोखीम जास्त प्रमाणात नसते.

आपल्या गरजा ओळखा

आपल्या गरजेनुसार गुंतवणूक करण्याची योजना आखणे अवश्यक आहे. आपल्या पैश्यांचा वापर कसा करावा,याची स्पष्ट जाणीव आपल्याला असायला हवी. आपण जर योग्य वेळी गरज ओळखून गुंतवणक केली नाही तर, आपल्याला भविष्यात त्याचा योग्य वेळी परतावा मिळणे कठीण जाईल.

मालमत्तेचे योग्य वाटप महत्वाचे

आपली संपत्ती किंवा गुंतवणूक ही योग्य आणि विविध वर्गांमध्ये विभागली गेली पाहिजे. पोर्टफोलिओ स्टॉक,बाँड आणि रोख यांसारख्या विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तुमच्या मालमत्तेचे योग्य वाटप होते. यावरच भविष्यात तुम्हाला त्याचा किती नफा-तोटा होणार हे अवलंबुन असते.

चक्रवाढ व्याजाचा फायदा

तुमच्या गुंतवणूकीवर वाढत जाणारे चक्रवाढ व्याज हीच तुमची गुंतवणूकीतील खरी ताकत आहे. तुम्ही सुरुवातीला केलेल्या गुंतवणूकीवरील व्याज आणि अखेरिस मिळणारा परतावा यामुळे तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य वाढते.

मार्केटशी केंद्रीत गुंतवणूक करु नका

अनेक जण जेव्हा मार्केटची स्थिती योग्य राहील, तेव्हा गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधतात. मात्र असे न करता, तुम्ही योग्य पर्याय निवडून ठराविक उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी वेळीच गुंतवणूक करा. केवळ गुंतवणूक करतांना आपण किती जोखीम उचलायची हा पर्याय आपल्या हातात आहे.

कंपनी आकारत असलेल्या शुल्काचा विचार करा

तुम्ही गुंतवणूक केलेले शुल्क कालांतराने तुमच्या परताव्यात बदलू शकते. तुम्ही गुंतवणूक करत असतांना केवळ गुंतवणूकीचे शुल्क, कर, व्याज आणि उशीर झाल्यास भरावा लागणारा दंड या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ समजुन घेणे गरजेचे असते.

शिस्त आणि संयम आवश्यक

तुम्ही गुंतवणूक करीत असतांना शिस्त आणि संयम आवश्यक आहे. बाजार अस्थिर असतांना देखील तुमच्या गुंतवणूक धोरणाला चिकटून राहा.

भावनिक होऊन निर्णय घेऊ नका

गुंतवणूक करतांना भावनिकपणे घेतलेले निर्णय चुकतात. तेव्हा त्यावेळी भीती किंवा कुठलाही लोभ मनात नसावा.

व्यावसायिक सल्ला

गुंतवणूक करणे गुंतागुंतीचे असु शकते. यामध्ये स्पष्टता हवी असल्यास आपण सल्लागारांची मदत घ्यावी. आर्थिक सल्लागार यासाठी तुम्हाला मदत करु शकते.