Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India's First Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं वैशिष्टय तुम्हाला ठाऊक आहे? तिकिटांचा दरही माहिती करून घ्या

Bullet Train in india

Image Source : www.businesstoday.in

India's First Bullet Train: बहुचर्चित भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड़्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी एकूण 1 लाख 10,000 कोटी रूपयांची आवश्यकता असणार आहे.

India's First Bullet Train: बहुचर्चित भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद(Mumbai to Ahmedabad) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांचा ड़्रीम प्रोजेक्ट(Dream Project) आहे. सध्या या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम जोराने सुरु आहे. नुकतीच या ड्रीम प्रोजेक्ट संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यातून या बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या बुलेट ट्रेनची 4 स्थानकं महाराष्ट्रात आहेत, तर उर्वरित दुसऱ्या राज्यात आहेत. या प्रकल्पामुळे दोन राज्यांना व्यापारिक दृष्ट्या जोडण्यासाठी मदत होणार आहे. एवढ्या चर्चेत असलेल्या या ट्रेनचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे? साधारण एकेरी प्रवासासाठी किती रुपये तिकिट आकारलं जाऊ शकतं, याची काही कल्पना आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.  

ही आहेत बुलेट ट्रेनची 8 वैशिष्टये(8 features of bullet train)

  1. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग मुंबई ते अहमदाबाद असा असणार आहे 
  2. बुलेट ट्रेनच्या कॉरिडॉरची लांबी 506 किलो मीटर इतकी असले
  3. प्रकल्प पुर्ण होण्यासाठी तब्बल 1 लाख 10,000 कोटी रूपयांची आवश्यकता असणार आहे 
  4. अरबी समुद्रातून एकूण 7 किलोमीटरचा अंडरवॉटर बोगदा यासाठी तयार करण्यात येणार आहे 
  5. देशातील पहिलीच बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार आहे 
  6. 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड(New Austrian Tunneling Method)' आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्याचे कामकाज होणार आहे 
  7. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असणार आहेत 
  8. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित व स्वयंचलित दरवाजांनी संपन्न असेल

बुलेट ट्रेन एकेरी प्रवासासाठी मोजावे लागतील इतके रुपये?(Bullet Train Ticket Rate)

  • बीकेसी ते विरार(BKC to Virar) इतक्या अंतराच्या प्रवासाकरिता 500 रूपये खर्च येणार आहे, तर यासाठी 24 मिनिटे वेळ लागणार आहे
  • तेच बीकेसी ते भोईसर(BKC to Boisar) या अंतरासाठी 750 रूपये एकेरी तिकिटाला खर्च करावे लागणार आहेत, व यासाठी 39 मिनिटे वेळ लागणार आहे
  • बीकेसी ते ठाण्यासाठी(BKC to Thane) 250 रूपये एकेरी तिकीट असणार आहे व यासाठी फक्त 10 मिनिटं वेळ लागणार आहेत.