Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Modi's Total Assets: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेअर, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक नाही, वाचा एकूण संपत्ती

Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता 26 लाख रुपयांनी वाढल्याची माहिती पीएमओच्या वेब पोर्टलवरुन समोर आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही. तसेच त्यांची वैयक्तिक नावे शेअर, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंडात देखील गुंतवणूक नाही. (PM Narendra Modi's Total Asset's)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती किती याबाबतची (PM Narendra Modi's Total Asset's)  ताजी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO Website) वेबसाईटवर ही पंतप्रधान मोदींच्या संपत्तीची माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्तीत 26.13 लाख रुपयांनी वाढली आहे. यात बहुतांश व्याज उत्पन्नाचा समावेश आहे. पीएम मोदी यांची एकूण संपत्ती 2.23 कोटी आहे. विशेष म्हणजे पीएम मोदी यांची कोणत्याही बॉण्ड, शेअर किंवा म्युच्युअल फंडांत गुंतवणूक नाही. (PM Narendra Modi Has No Investment In any Bond, Shares and MF)

पीएमओने दिलेल्या अद्ययावत तपशिलानुसार पीएम मोदी यांच्याकडे 31 मार्च 2022 अखेर 35,250 रुपये इतके रोख स्वरुपात होते. त्याचबरोबर टपाल कार्यालयातील नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (National Saving Certificate-NSC) मोदी यांची 9,05,105 रुपये गुंतवणूक आहे. आयुर्विमा पॉलिसींचे (Insurance Policy) मूल्य 1,89,305 रुपये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती 2,23,82,504 रुपये आहे. 31 मार्च 2021 अखेर नरेंद्र मोदी यांच्याकडे 1.1 कोटींची स्थावर मालमत्ता होती.आता ती देखील त्यांच्या नावे नाही. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गांधीनगर येथे एक भूखंड खरेदी केला होता. गांधीनगरमधील सर्व्हे नं.401/A हा आणखी तीन भागीदारांसोबत खरेदी केला होता. या भूखंडामध्ये चौघांची प्रत्येकी 25% मालकी होती. मात्र या भुखंडावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालकी राहिलेली नाही. हा भूखंड दरम्यानच्या काळात दान केल्याचे बोलले जाते.  

मोदींकडील जंगम मालमत्तेत गेल्या वर्षाच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली.पंतप्रधान मोदी यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठी असून त्यांचे एकूण मूल्य 1.73 लाख रुपये आहे. मोदी यांची कोणत्याही बॉंडमध्ये, शेअरमध्ये आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही, असे या माहितीतून समोर आले आहे.