Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

No Cost EMI: दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी 'नो कॉस्ट ईएमआय'मधील तत्थ्य जाणून घ्या!

Understand the No Cost EMI

No Cost EMI: नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.

No Cost EMI: नुकताच दसरा झाला आहे; आता दिवाळीचे वेध सुरू होतील. त्यामुळे याकाळात खरेदीची मोठी लयलूट असणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाठ ऑफर्स देऊन तर बँकांकडून नो कॉस्ट ईएमआय, झिरो पर्सन्ट ईएमआय, बाय नाऊ, पे लेटर (Buy Now Pay Later) अशा वेगवेगळ्या जाहिरातींचा भडिमार होतो. पण अशा जाहिरातींना आणि ऑफर्सना बळी पडू नका.

ऑफर्स देणाऱ्या कंपन्या आणि सवलतीच्या दरात अल्प मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका यांचे नियम, छुपे अजेंडा समजून घेऊनच खरेदी करा. नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) ही एक अशीच सुविधा ग्राहकांच्या माथी मारली जाते. नो कॉस्ट ईएमआयच्या नावाखाली स्वस्त, सवलतीत आणि कोणतेही व्याज न आकारता ग्राहकाला एखादी वस्तूची किंमत ईएमआयमधून भरण्याची सुविधा दिली जाते. पण खरंच बँका किंवा ई-कॉमर्स कंपन्यांकडून दिली जाणारी ही सुविधा ग्राहकांच्या फायद्याची आहे का? हे समजून घेणे गरजेचे आहे.  

नो कॉस्ट ईएमआयची सुरुवात!

नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. या सुविधेमुळे ग्राहकांना खरेदी करताना एकरकमी पैसे जमा करण्याची गरज पडत नाही. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.

जर एखाद्या ग्राहकाला 40 हजारांची वॉशिंग मशीन खरेदी करायची आहे. पण त्याच्याजवळ एवढी रक्कम एकत्रित नसेल तरीही तो नो कॉस्ट ईएमआय या पर्यायाचा वापर करून हप्त्त्याने पैसे भरून ती वस्तू खरेदी करू शकतो. यामध्ये ग्राहकाला एकदम 40 हजार रुपये भरण्याऐवजी 3, 6, किंवा 12 महिन्यांच्या कालावधीत पैसे भरण्याची सुविधा मिळते. तसेच त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही, असे बँक आणि कंपन्यांकडून सांगितले जाते.

No Cost EMI मधून कंपन्यांचा फायदा काय?

नो कॉस्ट ईएमआय ही कंपन्या आणि बँकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेली सुविधा आहे. त्यामुळे याचा या दोघांनाही फायदा होतो. फक्त ग्राहकाला फायदा मिळण्याऐवजी त्याची सोय मात्र होते. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला पैसे साठवून ठेवण्याची गरज नाही. तो त्याचे पैसे ईएमआयद्वारे भरू शकतो, तेही बिनव्याजी. पण यामध्ये कंपन्यांकडून एक चलाखी केली जाते. ती म्हणजे ज्या प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय ही सुविधा उपलब्ध असते. त्याची किंमत आणि ओपन मार्केटमधील त्याची किंमत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. हा फरकच ई-कॉमर्स कंपन्या आणि बँकांची कमाई असते. पण ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत असे भासवले जाते की, तुमच्याकडून फक्त प्रोडक्टची किंमत वसूल केली जात आहे. त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. पण मुळात त्या वस्तुच्या किंमतीमध्ये व्याजाची रक्कम ही अगोदरच अ‍ॅड केलेली असते.

खरेदीदारांनी काय काळजी घ्यावी?

खरेदीदारांनी सर्वप्रथम कोणतीही सुविधा वापरण्यापूर्वी त्याचे नियम व अटी जाणून घेणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर एखाद्या वस्तुची मूळ किंमत काय आणि त्याला ती नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत कितीला मिळते. हे जाणून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करताना वेगवेगळ्या दुकानांमध्ये किंवा वेबसाईटवर त्याच्या किमतीमधील फरक जाणून, समजून घ्या आणि मगच खरेदी करा.