Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Diwali Shopping Tips: दिवाळीला वापरा ‘या’ शॉपिंग टिप्स आणि टाळा अनावश्यक खर्चाचा ताण!

Diwali Shopping Tips

Diwali Shopping Tips: दिवाळीला आपण सर्वात जास्त शॉपिंग करतो. सणासुदीच्या काळात आपण अनेकदा बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करतो आणि संपूर्ण बजेट बिघडते. जाणून घ्या अशा काही टिप्स ज्या तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवतील.

Tips to Save Money: आधी दसरा आणि आता दिवाळी. सणसमारंभ म्हटलं की शॉपिंग तर होणारच. दिवाळीच्या काही दिवस आधीच ऑफर्स आणि डिस्काउंट (Offers & Discounts) सर्वत्र सुरू होतात. अनेकदा आपण ऑफर्सच्या नादात बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करतो आणि संपूर्ण बजेट बिघडते. हे टाळण्यासाठी नेमक काय करावं?  ज्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या गरजेपुरती खरेदी करता येईल आणि त्यामुळे तुमचे पैसे ही वाया जाणार नाहीत.(Save money on Diwali shopping)

सर्वात आधी तुमचे बजेट तयार करा आणि मग खरेदीची यादी बनवा (Plan Budget and Make a list)

या दिवाळीला तुम्हाला काय खरेदी करायची आहे, हे ठरवून आधी खरेदीची यादी तयार करा. त्यानंतर तुमचे बजेट (Budget) किती आहे ते ठरवा. गरज आणि इच्छा यातील फरक तुम्हाला कळला पाहिजे. बजेटनुसार आधी गरजेच्या वस्तु खरेदी करा आणि मग आवडीच्या वस्तु खरेदी करा. यामुळे तुम्हाला काय खरेदी करायचे आहे खरेदीच्या वेळी कळेल. त्याचबरोबर गरजेच्या वस्तु घेऊन बजेटमधील काही रक्कम वाचली तर आवडत्या वस्तुसुद्धा घेऊ शकता. यामुळे बजेट बिघडणार नाही आणि तुमची बचत सुद्धा होईल. 

क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील ऑफर चेक करा (Check Credit & Debit Card Offers)


तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड (Credit card and debit card) वापरत असाल तर दिवाळीनिमित्य त्यावर अनेक प्रकारच्या ऑफर्स (Diwali offers)येत असतात. या ऑफर्सवर एक नजर टाका. याच्या मदतीने तुम्ही कमी पैशात चांगली डील मिळवू शकता. तुमच्याकडे एक पेक्षा जास्त कार्ड असल्यास त्यातील सर्वोत्तम ऑफर असलेले कार्ड वापरू शकता. 

ऑनलाईन खरेदीचा पर्याय वापरा (Online Shopping)

दिवाळीत अनेक इ कॉमर्स वेबसाइट्स (E-Commerce website)चांगल्या ऑफर्स घेऊन येतात. या ऑफर्सवर लक्ष ठेवा. ऑफरमधील वस्तू अनेकदा स्टॉकमधून लवकर संपतात. अशा परिस्थितीत, दोन ते तीन वेबसाइटवर आपल्या आवडीची गोष्ट चेक करा जे तुम्हाला परवडेल ते खरेदी करा. यामुळे दोन गोष्टी होतात  तुमच्या पैशांची बचत आणि तुम्हाला आवडती वस्तू सुद्धा मिळते. 

टाकावू पासून टिकाऊचा अवलंब करा

दिवाळीला तोरण, दिवे आणि घरातील आणखी काही शोभेच्या वस्तु नवीन खरेदी करून पैसे गुंतवण्यापेक्षा तुम्ही घरी सुद्धा काही वस्तू तयार करू शकता. उदा. दिवाळीला दरवर्षी आपण दिवे विकत आणतो, ते पुढल्या वर्षी तसेच राहतात. नवीन दिव्यांवर खर्च करण्यापेक्षा मागील वर्षीच्या दिव्यांना रंगवून, सजवून ते नवीन करता येऊ शकता. तसंच बाकीच्या वस्तुंचा सुद्धा पुनर्वापर करता येऊ शकतो. त्यासाठी यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ उपलब्ध आहेत.