Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Shopping Tips: कमीत कमी खर्चात ऑनलाईन शॉपिंग कशी करता येईल?

Online Shopping Tips: कमीत कमी खर्चात ऑनलाईन शॉपिंग कशी करता येईल?

Image Source : www.linkedin.com

Online Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Remember These Things for Online Shopping: ऑनलाईन शॉपिंगमुळे प्रत्येक वस्तू घरपोच मिळते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगला बहुतेकजण पसंती देतात. पण, ऑनलाईन शॉपिंग करताना तुमच्या निष्काळजीपणामुळे नुकसानही होऊ शकते. अशासाठी ऑनलाईन शॉपिंग करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची खरेदी अधिक किफायतशीर होईल आणि तुमचे बजेटही बिघडणार नाही.

काय घ्यायचंय त्याची यादी बनवा
शॉपिंग ऑनलाईन (Online Shopping) असो किंवा ऑफलाईन, ती करताना एक गोष्ट कधीच विसरू नका. ती म्हणजे, तुम्हाला काय घ्यायचे आहे; त्याची यादी बनवा. त्यानंतरच खरेदी करण्यासाठी वेबसाईटवर जा. असे केल्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू (Product) घ्यायच्या होत्या, तेवढ्याच घेतल्या जातील. पण जर तुमच्याकडे वस्तूंची यादी नसेल तर तुमच्याकडून गरज नसलेल्या वस्तुंची विनाकारण खरेदी होऊ शकते.

प्रत्येक ऑफर तपासा
अनेक वेळा ऑनलाईन खरेदी करताना कंपन्या विशिष्ट रकमेपर्यंतच्या शॉपिंगवरच कॅशबॅक (Cashback) किंवा इतर ऑफर देतात. अशावेळी खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ऑफर (Offer) तपासा. त्याच्या अटी समजून घ्या आणि मगच खरेदी करा. काही वेळेस यातून ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता असते.                

फिल्टर टूल वापरा
शॉपिंग वेबसाइट्सवर (Shopping Websites) उत्पादने फिल्टर (छाननी) करण्याचा पर्याय असतो. ऑनलाईन खरेदी करताना या फिल्टर टूल पर्यायाचा नक्की वापर करा. फिल्टरमध्ये ऑफर (Offer) किंवा डिस्काउंटचा (Discount) पर्यायही असतो. तो निवडून तुम्ही चांगल्या ऑफरमधून पैसे वाचवू शकता.

कोणतेही उत्पादन लगेच खरेदी करू नका
ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ती म्हणजे एखादी वस्तू किंवा उत्पादन तुम्हाला आवडले तर ते लगेच पैसे देऊन (Payment) खरेदी करू नका. त्या उत्पादनाबाबत इतर वेबसाईटवर माहिती घ्या. किमतीची, गुणवत्तेची तुलना करा आणि जिथे तुमचा फायदा अधिक आहे, तिथून खरेदी करा.

पेमेंटचे पर्याय तपासा
ऑनलाईन खरेदी करताना जर तुम्ही खरेदीच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच पेमेंट पेजवर (Payment Page) असाल तर पेमेंटचे सर्व पर्याय तपासून पाहा. बऱ्याच कंपन्या कॅश ऑन डिलेव्हरीवर (Cash On Delivery) अतिरिक्त शुल्क आकारतात. तर काही विशिष्ट कंपन्यांच्या क्रेडिट-डेबिट कार्डवर सूट देतात. त्यामुळे पेमेंट करताना हे सर्व पर्याय एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे.

रिटर्न पॉलिसी तपासा
ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना रिटर्न पॉलिसी (Return Policy) नेहमी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही ज्या वेबसाईटवरून खरेदी करत आहात त्या वेबसाईटची रिटर्न पॉलिसी आवर्जुन वाचा. एखादे उत्पादन आवडले नाही किंवा त्यात काही समस्या आली तर ती वस्तू परत करताना अडचणी येत नाहीत. पण जर कंपनीची रिटर्न पॉलिसी चांगली नसेल किंवा वस्तू रिटर्न घेतली जात नसेल, तर अशा वेबसाईटवर खरेदी करणे टाळा.