Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबद्दल बरीचशी माहिती आपण आतापर्यंत घेतली आहे. तुमच्या मनातील क्रेडिट कार्डबाबत आणखी काही प्रश्न असतील त्याची उत्तरे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
Table of contents [Show]
- क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड कसे मिळवायचे? आणि त्याचा वापर कसा करतात?
- कॅशबॅक क्रेडिट कार्ड किंवा रिवॉर्ड क्रेडिट कार्ड कसे निवडायचे?
- क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर काय होते?
- को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स म्हणजे काय?
- अॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
- क्रेडिट कार्ड खरेदी EMI मध्ये रूपांतरित करता येते का?
- क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय?
क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड कसे मिळवायचे? आणि त्याचा वापर कसा करतात?
क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात. त्याचप्रमाणे रिवॉर्ड पॉईंटची किंमतसुद्धा कार्डनुसार बदलते. हे जमा झालेले रिवॉर्ड पॉईंट्स रिडिम करण्यासाठी नेटबँकिंग, ऑफलाईन (पोस्टद्वारे), कस्टमर केअर किंवा थेट स्टोअर्समध्ये जाऊन पॉईंट्स रिडिम करू शकता.
कॅशबॅक क्रेडिट कार्ड किंवा रिवॉर्ड क्रेडिट कार्ड कसे निवडायचे?
कॅशबॅक क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर तुम्ही खर्च केलेल्या रकमेपैकी काही टक्के रक्कम ही कार्डधारकाच्या खात्यात पुन्हा जमा केली जाते. अशाप्रकारे मिळालेली कॅशबॅकची रक्कम कंपनीकडून वेळोवेळी खात्यात जमा केली जाते. तर रिवॉर्ड क्रेडिट कार्डवर केलेल्या प्रत्येक खरेदीवर आणि मिनिमम किमतीवर रिवॉर्ड पॉईंट देतात. उदाहरणार्थ, तुम्ही 100 रुपये खर्च करून 1 रिवॉर्ड मिळवू शकता. पण, कॅशबॅक मिळविण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते.
कॅशबॅक आणि रिवॉर्ड क्रेडिट कार्डची निवड करताना, त्या कार्डची किंमत, शुल्क आणि फायदे जाणून घेतले पाहिजेत. तुम्ही जर खूप सारे फायदे मिळवून घेण्यासाठी कार्ड घेणार असाल तर रिवॉर्ड क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी योग्य असू शकते. कार्डचा वापर प्रामुख्याने डायनिंग, सिनेमाची तिकिटं, इंधनासाठी करणार असाल तर, अशावेळी प्रीमियम रिवॉर्डस देणारे कॅशबॅक कार्ड योग्य ठरू शकते.
क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर काय होते?
दिलेल्या मुदतीपर्यंत क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही तर थकबाकीवर चार्ज आकारला जातो. हा चार्ज व्याजदर लावून आकारला जातो. सर्वसाधारणपणे वर्षाला 30 ते 49 टक्के या दरम्यान चार्ज आकारला जातो. याशिवाय, कार्डधारकाने एकूण बिल भरले नाही तर नवीन व्यवहारांवरही चार्ज आकारला जातो. पूर्वीच्या बिलाची रक्कम पूर्ण झाल्याशिवाय नवीन खरेदीवर चार्ज लावला जातो.
को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स म्हणजे काय?
को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणजेच, जे कार्ड नामांकित व्यवसायिकांसोबत भागीदारीमध्ये वापरले जाते आणि यावर विशिष्ट ब्रॅण्ड किंवा सर्व्हिससाठी विशेष ऑफर दिली जाते.
अॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
अॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजेच मूळ क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त मिळणारे कार्ड. हे अतिरिक्त कार्ड कुटुंबातील सदस्यांसाठी जसे की, जोडीदार, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले किंवा पालकांसाठी असू शकते. अॅड-ऑन कार्ड हे बऱ्याचवेळा मोफत दिले जाते. पण, हे प्रत्येक बँकेवर अवलंबून असते. मूळ क्रेडिट कार्ड सर्व अॅड-ऑन कार्डशी जोडलेले असते.
क्रेडिट कार्ड खरेदी EMI मध्ये रूपांतरित करता येते का?
होय, क्रेडिट कार्ड खरेदी EMI मध्ये रूपांतरित करता येते.
क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे एका क्रेडिट कार्डची थकबाकी रक्कम दुसऱ्याकडे कार्डमध्ये ट्रान्सफर करणे. ही एक चलाखी आहे; जी अनेक बँका ग्राहकांना दुसर्या क्रेडिट कार्डवर स्विच करण्यासाठी वापरतात. बॅलन्स ट्रान्सफर हे प्रामुख्याने कमी व्याजदराचा लाभ घेण्यासाठी आणि क्रेडिट कार्डवर चालू असलेले कर्ज टाळण्यासाठी केले जाते.