2022 या वर्षांत क्रिप्टोकरन्सी मार्केटने भरपूर चढउतार पहिले. मोठमोठ्या घटनांमुळे यावर्षी क्रिप्टो मार्केट अनेकवेळा पडताना दिसलं. यावर्षीची क्रिप्टो मार्केटमधील स्थिती वाईट असतानाही अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स 2023 मध्ये क्रिप्टो मार्केटकडून मोठी आशा बाळगून आहेत. मार्केटने या वर्षभरात जेवढा डाऊन ट्रेण्ड पाहिला आहे; तेवटा तेवढाच रिटर्न पुढील वर्षात मिळण्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तवली जात आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर तुम्ही कोणत्या कोणत्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कराल. चला तर मग जाणून घेऊयात 2023 मधील 3 सुपरहिट ठरू शकणाऱ्या क्रिप्टोकरन्सीजबद्दल.
व्हाईट बिट टोकन (WhiteBit Token)
व्हाईट बिट प्लॅटफॉर्मचे व्हाईट बिट टोकन ही ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच झालेले सर्वात नवे व बेस्ट टोकन आहे. तुम्ही जर व्हाईट बिट प्लॅटफॉर्म वापरात असाल तर तुम्हाला या टोकनमध्ये अजून काही बेनिफिट्स देखील मिळू शकतात. या टोकनची खास बात म्हणजे या टोकनच्या विक्रीदरम्यान केवळ 15 मिनिटांमध्ये 1 बिलिअन टोकन्स विकले गेले होते. त्यामुळे इन्वेस्टर्स आणि ट्रेडर्स या टोकनवर किती प्रेम करत आहेत हे समजते. या टोकनची दुसरी खासियत म्हणजे त्याचे बर्निंग मॅकेनिजम (Burning Mechanism). बर्निंग मॅकेनिजम ही एक अशी प्रक्रिया असते; ज्यामध्ये काही टोकन्स मार्केटमधून बर्न केले जातात, म्हणजेच काढले जातात. ज्यामुळे त्यांची मागणी वाढते व पुरवठा थोडा कमी होतो. बर्निंग मॅकेनिजममुळे किमतीमध्ये स्थिरता आणणे शाक्य होते. व्हाईटबीटच्या लाँच दरम्यान त्याची किंमत 1.90 डॉलर्स म्हणजेच 154 रुपये होती. जी ऑक्टोबरमध्ये 14.64 डॉलर्स म्हणजेच 1202 रुपये झाली.
बिटकॉईन (Bitcoin)
बिटकॉईनचा परफॉर्मन्स यावर्षी कसाही असला तरी 2023 च्या यादीत त्याचे नाव असणारच. कारण बिटकॉईनचा मागील 10 वर्षांचा जर परफॉर्मन्स पाहिला तर त्याने 1 लाख टक्के टक्के रिटर्न्स दिले आहेत. दुसरे म्हणजे, बिटकॉईनला सर्वात विकेंद्रित आणि उपयुक्त ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा पाठिंबा आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा फायदा होणार असल्याचे व त्याचा परिणाम बिटकॉईनच्या किमतीमध्ये दिसून येणार असल्याचे संकेत मार्केटमध्ये दिसत आहेत. अनेकांच्या मते पुढील 10 वर्षात बिटकॉईनची वाढ 5 हजार टक्के वाढून त्याची किंमत 1 मिलियन डॉलर्स देखील होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच त्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते, असे क्रिप्टोमार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ॲपकॉईन (Apecoin)
मार्च 2022 मध्ये लॉन्च झालेली ही क्रिप्टोकरन्सी नवीन आहे. लवचिकता ही या क्रिप्टोकरन्सीची खासियत आहे. यावर्षीच लॉन्च होऊनदेखील या कॉईनचा ऑल टाईम हाय 39 डॉलर्स आहे. सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन NFT’s सोबत या क्रिप्टोकरन्सीचा संबंध असल्याने ही करन्सी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच या क्रिप्टोकरन्सीला मोठमोठ्या सेलेब्रिटीज आणि क्रिप्टो इन्फ्लुएन्सर्सचा पाठिंबा असल्याने ही क्रिप्टोकरन्सी कायम ट्रेंडिंग असते. अॅपकॉईनची ही क्रेझ पुढच्यावर्षी त्याच्या किमतीत मोठा बदल घडवून आणू शकते. यामुळे अॅपकॉईनची किंमत जवळजवळ 300 डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
(डिसक्लेमर: क्रिप्टोकरन्सीच्या या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी-विक्रीबाबत कोणताही सल्ला देत नाही.)