Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बिटकॉईन आणि सोन्याच्या शर्यतीत विजयी कोण?

bitcoin rate gold rate

आपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहिती आहेच. त्याचनुसार गुंतवणुकीतील बिटकॉईन आणि सोन्याच्या (bitcoin vs gold) कोण विजय ठरतं ते आपण पाहणार आहोत!

बिटकॉइन (Bitcoin) आणि सोनं (Gold) या गुंतवणुकीतील दोन उत्पादनांमधील शर्यत आणि क्रिप्टो मार्केटची (Crypto Market) सध्याची स्थिती पाहता या शर्यतीत सोनंच जिंकेल, हे कोणीही सांगू शकेल. पण ही शर्यंत जर 5 वर्षापर्यंत लांबवली तर या शर्यतीत कोण विजयी ठरेल हे सांगणं थोडं कठीण आहे. चला तर मग समजून घेऊयात या शर्यतीत कोण जिंकतंय?


जागतिक क्रिप्टो मार्केट (World Crypto Market) मोठ्या प्रमाणात घसरत असल्यामुळे ‘बिटकॉईन की सोनं?’ ही गुंतवणुकीतली चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ लागली आहे. बिटकॉईन हा ससा आणि कासवाच्या शर्यतीतील सशाला दर्शवितो. तर सोनं अर्थातचं कासवाला दर्शवतं. बिटकॉईन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित असून, साठविण्यास सोपे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महागाईत फायदेशीर मानले जाते. परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) किंमत सुरूवातीला जेवढी होती, आता तेवढीच झाली आहे.

BITRCOIN vs Gold


बिटकॉईनने 17 डिसेंबर, 2017 रोजी सर्वप्रथम 20,089 डॉलरचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर नवनवीन चढ-उतार करत 69,000 डॉलरपर्यंत मजल मारली. सध्या जगप्रसिद्ध बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीची (Bitcoin Cryptocurrency) आताची किंमत पुन्हा एकदा 20,000 डॉलर झाली आहे आणि त्यात अजून घसरण सुरूच आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी बिटकॉईन खरेदी केले असते तर आता तुम्ही तोट्यात असता. बिटकॉईनच्या या अस्थिरतेमुळे, बिटकॉईन महागाईच्या काळात फायदेशीर  ठरू शकतो, यावरून लोकांचा विश्वास उडू लागला आहे. 2021 पर्यंत बिटकॉईनची किंमत वरवर सरकत होती. पण 2022 मध्ये बिटकॉईनची किंमत धडाधड खाली येऊ लागली.

Rabbit and tortoise story


 याच्या विरुद्ध सोनं ज्याला पारंपरिक आणि गुंतवणुकीची जुनी पद्धत मानली जाते. जे साठविण्यास कठीण, कमी वेगाने वाढणारे असूनही गेल्या 5 वर्षात 75 टक्क्यांनी वाढले. आजच्या घडीला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत (24 Carat Gold Price) 52,500 रूपये आहे. याच सोन्याची किंमत 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये 30,000 रूपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. टक्केवारीत सांगायचं झालं तर 2017 पासून सोन्याच्या किमतीत 75 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

भविष्यात बिटकॉईन आणि सोनं यांची किंमत व महत्त्वं काय असेल कोणालाच माहिती नाही. पण आताची परिस्थिती पाहता, ससा आणि कासवाच्या शर्यतीनुसार या शर्यतीमध्ये सोनंच विजयी ठरलं आहे.