Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Coin & Crypto Token यामध्ये काय फरक आहे?

difference between crypto coin & crypto token

Difference Between Crypto Coin & Crypto Token: 'क्रिप्टो कॉईन', 'क्रिप्टो टोकन' आणि 'क्रिप्टोकरन्सी' हे वाक्ये परस्पर बदलून वापरतात, परंतु ते समान नाहीत. जरी कॉईन आणि टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत असले तरी कॉईन आणि टोकनमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये कॉईन्स आणि टोकन्स हे दोन्ही एकच असल्याचा गैरसमज लोकांमध्ये होताना दिसतो. अनेकवेळा लोक टोकन्सना कॉईन तर कॉईन्सना टोकन समजतात व त्याच प्रकारे संबोधतात. कॉईन्स आणि टोकन्स ही वेगवेगळी नावे असून त्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ज्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये महत्त्वाच्या आहेत. पण त्यांना एकत्र वापरल्याने अनेकवेळा गोंधळ निर्माण होतो. जर तुमचा देखील कॉईन्स आणि टोकन्समध्ये गोंधळ होत असेल तर यातील फरक नक्की समजून घ्या.

क्रिप्टो कॉईन म्हणजे काय? What is Crypto Coin?

क्रिप्टो कॉईन्स या क्रिप्टोकरन्सी असतात; ज्यांचे मूळ ब्लॉकचेन असते. उदाहरणार्थ बिटकॉईन या ब्लॉकचेनच्या कॉईनचे नाव BTC आहे. इथेरियमच्या कॉईनला ETH तर लिटकॉईनला LTC कॉई म्हणतात. हे कॉईन्स तयार करण्यामागचे मूळ उद्देश्य म्हणजे क्रिप्टोकरन्सीची व्हॅल्यू स्टोर करणे व इतर सामान्य चलनांप्रमाणे देवाण-घेवाणीदरम्यान माध्यमाचे काम करणे. यामुळेत क्रिप्टो कॉईन्सना क्रिप्टोकरन्सी म्हणून देखील संबोधले जाते. हे कॉईन्स प्रूफ-ऑफ- वर्क किंवा प्रूफ-ऑफ-स्टेक सिस्टिमद्वारे माईन केले जातात.

क्रिप्टोकरन्सी जेव्हा तयार केली गेली होती तेव्हा त्याचा वापर चलनाप्रमाणे व्हावा, हा उद्देश होता. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी या कॉईन्सची निर्मिती झाली आणि या  कॉईन्सचा वापर इतर चलनांची देवाणघेवाण, वस्तू आणि सेवांसाठी पैसे देणे तसेच इतरांना हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.

या आहेत प्रसिद्ध क्रिप्टो कॉईन्स 

बिटकॉईन (Bitcoin)

2009 च्या सुरुवातीला रहस्यमय 'सतोशी नाकामोटो' द्वारे लॉन्च केले गेलेले, बिटकॉईन हे जगातील पहिले आणि सर्वात प्रसिद्ध असे क्रिप्टो कॉईन आहे. बिटकॉईनच्या हेड स्टार्टने बिटकॉईनला क्रिप्टो मार्केटमधील सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सी बनवली आहे.

इथर (ETH) 

हे क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो कॉईन्सपैकी एक आहे आणि केवळ क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) नसून त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची निर्मिती आणि अंमलबजावणी करणारे इथेरियम हजारो ब्लॉकचेन प्रकल्प आणि NFT चे घर बनले आहे. 

टोकन म्हणजे काय? What is Token?

क्रिप्टो कॉईन्सप्रमाणे, क्रिप्टो टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून डिझाईन केलेले असतात. असे असले तरी क्रिप्टो टोकनचे मूळ ब्लॉकचेन नसून, टोकन्स हे ब्लॉकचेनवर आधारित तयार केले जातात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या मदतीने टोकेन्सचा वापर विविध उद्देश पूर्ण करण्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे क्रिप्टो कॉईन्स हे एखाद्या चालनाप्रमाणे काम करतात तसेच क्रिप्टो टोकन्स हे एका अॅसेटप्रमाणे काम करतात.

क्रिप्टो टोकन्सचा वापर डिजिटल उत्पादन किंवा NFT किंवा अगदी एखाद्या वस्तूमध्ये मालकीचा वाटा दर्शवण्यासाठी होऊ शकतो. क्रिप्टो टोकन, क्रिप्टो कॉईन्सप्रमाणे खरेदी केले जाऊ शकतात, विकले जाऊ शकतात किंवा त्यांचा व्यापारही केला जाऊ शकतो. पण त्यांचा वापर देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून करणे शक्य नाही. काही प्रसिद्ध टोकन्स पुढीलप्रमाणे आहेत.

  1. फाईलकॉइन अरवेअवे (Filecoin Arweave Coin)
  2. अक्सि इन्फिनिटी (Axie Infinity Coin)
  3. क्रोनॉस (Cronos Coin)

बरेच लोक 'क्रिप्टो कॉईन', 'क्रिप्टो टोकन' आणि 'क्रिप्टोकरन्सी' हे वाक्ये परस्पर बदलून वापरतात, परंतु ते समान नाहीत. जरी कॉईन आणि टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत असले तरी कॉईन आणि टोकनमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. क्रिप्टो कॉईन्स आणि क्रिप्टो टोकन्स यांची वेगवेगळी खरेदी होते. जी तुम्ही तुमच्या ट्रेडिंग टर्मिनलद्वारे करू शकता.