Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoffs News: Byju's मध्ये पुन्हा नोकरकपात सुरू, 1,000 कर्मचाऱ्यांना केले बेदखल

Byju's Layoff News

Byju's Layoffs News: ऑनलाईन टिचिंग अॅप कंपनी म्हणून आपल्याला Byju आपल्याला चांगलीच परिचयाची आहे. याच Byju मध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1,000 कर्मचाऱ्यांना Byju ने नारळ दिला आहे.

Byju's Layoffs News: आर्थिक मंदीचे संकट असताना अनेक मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची नोकरकपात करत आहेत. यावेळी ऑनलाईन टीचिंग अॅप कंपनी बायजूकडून(Byju) मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा बायजूने(Byju) आपल्या 1,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. बायजू ही बाजारपेठेतील एक प्रकारची ऑनलाईन टीचिंग अॅप कंपनी असून याद्वारे मुलांना घरात राहून ऑनलाईन अभ्यास करता येतो. या कंपनीने भारतातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अशातच ही नोकरकपात करण्याचे नेमके कारण काय? हे जाणून घेऊयात.

1,000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायजूने(Byju) आपल्या 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या अभियांत्रिकी, विक्री, लॉजिस्टिक, विपणन आणि संप्रेषण टीममध्ये ही टाळेबंदी झाली आहे. अभियांत्रिकी टीममधून 15 टक्के कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2022 मधील ऑक्टोबर महिन्यापासून अभियांत्रिकी टीममध्ये 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्याची पाहायला मिळत आहे.

Google Meet वर नोकरकपातीची घोषणा

असे सांगण्यात येत आहे की, मेलवर कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरकपाती बद्दल सांगितले गेले नाही. बायजूने आपल्या कर्मचार्‍यांना गुगल मीटवर आणि व्हॉट्सअॅप कॉलमध्ये सामील होण्यास सांगितले आणि तेथे त्यांना नोकरकपातीबद्दल माहिती दिली.

आर्थिक अस्थिरतेमुळे घेतला निर्णय

कंपनीचे मालक बायजू रवींद्रन यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी 2500 कर्मचार्‍यांना एक भावनिक मेल पाठवला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कंपनीतील आर्थिक अस्थिरतेमुळे त्यांनी कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. नफ्याचा मार्ग अवलंबण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, असे सांगत बायजू रवींद्रन म्हणाले की, कर्मचार्‍यांची नोकरकपात करताना त्यांना अतिशय वाईट वाटत आहे. ज्यांच्यामुळे कंपनी मोठी झाली त्यांना कामावरून काढताना अतिशय वाईट वाटत आहे.