Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate: नवं घर खरेदी करणार असाल तर, 'या' शहरांमध्ये रिकामे आहेत 4.61 लाख फ्लॅट्स!

Real Estate

Image Source : www.housing.com

Real Estate: तुम्हीही नवीन घराच्या शोधात असाल, तर 'PropEquity' या कंपनीने सांगितलेल्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला हव्या असणाऱ्या शहरातील रिकाम्या फ्लॅट्सची संख्या जाणून घ्या.

Real Estate: आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाचं वाटतं, म्हणूनच तर प्रत्येक जण पैशांची जुळवाजुळव करून घर खरेदी करण्याचा विचार करतात. सध्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये(Real Estate) बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. घरांच्या किंमती देखील जवळजवळ स्थिर पाहायला मिळत आहेत. याचाच परिणाम असा की, घरांच्या विक्रीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. देशातील रिकामी घरांची संख्या  4.61 लाखांवर आली असून जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

'PropEquity' च्या माहितीनुसार

रिअल इस्टेट मार्केटवर नजर ठेवणारी कंपनी 'PropEquity' च्या माहितीनुसार डिसेंबर 2022 च्या अखेरीस देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 10 टक्क्यांनी कमी होऊन 4,61,000 वर आल्याचे पाहायला मिळाले आहे.  घरांची चांगली विक्री झाल्याने  हे शक्य झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत म्हणजे सप्टेंबरमध्ये या 9 शहरांमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या 5,12,526 पर्यंत पाहायला मिळाली.

गृहकर्ज घेणाऱ्यांचीच्या संख्येमध्ये वाढ

'PropEquity' चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जासुजा(Sameer Jasuja) यांच्या म्हणण्यानुसार, अनेक आव्हानं असूनही या वर्षी घरांच्या विक्रीत चांगली सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे रिअल इस्टेट उद्योगात मागणी आणि सकारात्मक धारणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरबीआयकडून व्याजदरात मोठी वाढ होऊनही ग्राहक गृहकर्ज(Home Loan) मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

मुंबई आणि कोलकत्ता येथील रिकामी घरांची संख्या कमी

PropEquity च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर अखेरीस कोलकाता येथे रिक्त घरांची संख्या 20,096 इतकी असून डिसेंबरमध्ये ती 12 टक्क्यांनी घटून 17,715 वर आल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईत ही संख्या 30,986 वरून 27,815 युनिट्सवर म्हणजेच 10 टक्क्यांनी कमी झाली होती, याउलट मुंबईत 61,755 वरून 5 टक्क्यांनी घटून 58,587 वर आल्याचे दिसून आले. ठाण्यातील रिकाम्या घरांची संख्या 1,08,854 युनिटवरून 11 टक्क्यांनी घसरून 97,117 इतकी झाल्याचे पाहायला मिळाले.  
दिल्ली एनसीआरमध्ये विक्री न झालेल्या घरांची एकूण संख्या 46,452 वरून 10 टक्क्यांनी घसरून 41,693 युनिट्सवर आली. तर बेंगळुरूमध्ये हा आकडा 58,390 वरून 16 टक्क्यांनी घसरून 49,246 युनिटवर आल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात हीच घरांची संख्या 71,644 युनिटवरून 11 टक्क्यांनी घसरून 65,612 युनिटवर आला आहे. हैदराबादमध्ये सप्टेंबरच्या शेवटी रिकाम्या घरांची संख्या 93,473 होती, जी आता केवळ 93,473 युनिट्स पाहायला मिळत आहे.