Successful Retail Business of India: भारतात मुंबईत इंग्रजांनी मोठ मोठे मॉलप्रमाणे सर्व वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ मिळणारे सुपरमार्केटपेक्षा मोठे असणारे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केले होते, मात्र ते स्टोअर केवळ इंग्रजांसाठी होते. इंग्रज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातून गेल्यावर ते स्टोअर्स चालवणाऱ्यां जागा विकल्या आणि ते इंग्लंडला निघून गेले. त्यानंतर खुराकिवाला यांनी त्यातील फोर्टमधील एक जागा विकत घेऊन तेथे पहिले भारतीय आणि भारतीयांसाठीचे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केले होते. त्यानंतर रिटेल इंडस्ट्रीमध्ये फार मोठा बदल घडवला तो किशोर बियाणी यांनी, बिग बाझार सुरू करून त्यांनी रिटेल इंडस्ट्रीला मॉडर्न बनवले. त्यांनी मॉडर्नट्रेडची सुरुवात केली.
किशोर बियाणी यांनी बिग बाझार सुरू करण्यापूर्वी 1991 मध्ये पँटलून्स (Pantaloon) सुरू केले होते. खरेतर अर्स्टव्हाइल मेन्स वेअर हे 1987 साली सुरू केलेल्या ब्रँडचे नामकरण करून पँटलून्स हे नाव ठेवण्यात आले होते. मात्र नामकरणासह त्यांनी याद्वारे रिटेल इकोसिस्टीमची पहिली पायरी गाठली, मग त्यांनी मल्टीब्रँड रिटेल स्टोअर बिग बाझार सुरू केले, ज्याला आजच्या भाषेत मॉल म्हणतात. 2001 साली बिग बाझार लोअर परळ येथे सुरू करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 22 दिवसांमध्येच कोलकाता, बेंगळुरू आणि हैद्राबाद येथे बिग बाझारची चेन स्टोअर्स ओपन झाले होते, हे स्टोअर्स साधारण 10 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त मोठ्या क्षेत्रफळाचे होते. मुंबईतले स्टोअर तर 52 हजार चौरस मीटरएवढे मोठे होते. त्यामुळे असे चकचकीत, जाएंट स्टोअर सुरू झाल्यामुळे सर्वत्र बिग बाझारची चर्चा सुरू झाली होती. लगेचच दोन वर्षात त्यांनी ग्रोसरी फूड बाजार, मग फॅशन बिग बाझार असे सुरू केले.
बिग बाझारचे बिझनेस मॉडेल काय आहे? (What is Big Bazaar's business model?)
बिग बाजार बीटूसी (B2C) बिझनेस मॉडेलवर काम करते, अर्थात बिझनेस टू कन्झुमर, यात वस्तू थेट ग्राहकाला विकली जाते. एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना सर्व प्रकारची उत्पादने विक्रीसाठी ठेवले जातात. हे भारतातील सर्वात मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरपैकी एक मानले जात होते, नंतरच्या काळात याची गणती मॉलमध्ये झाली. कंपनी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर देत आहे, या मुख्य कारणामुळे ते लोकप्रिय झाले.
घर - फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, खेळणी, खेळ आणि फिटनेस, किराणा, कपडे, चित्रपट आणि संगीताच्या सिडीज, पादत्राणे, हस्तकलेचे सामान, डेकोरेशनचे सामान, शाळा - महाविद्यालयांची स्टेशनरी, स्वयंपाकघर उपकरणे इत्यादी सर्व उत्पादने बिग बाझारच्या एकाच छताखाली मिळतात. तर मुख्य म्हणजे, स्वत:च्या गार्मेटच्या कपड्यांसह, इतर गार्मेंट कंपन्यांचे कपडे यात ठेवले जातात.
बिग बाझारमध्ये कपड्यांवर साधारण हजार टक्क्यांचे मार्जिन ठेवले जाते. तर इतर वस्तूंवर त्या - त्या कंपनी आणि इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडनुसार मार्जिन ठरलेले असते. यात किमान 25 टक्के मार्जिन मिळते. तर, ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी त्यांनी सेल, आठवड्याच्या विशिष्ट दिवशी सवलत असे प्रकार आणले, ज्यामुळे हमखास ग्राहकांची पावले बिग बाझारमध्ये येऊन थांबू लागली. बिग बाझार हे जागा विकत घेऊन स्वत:चे मॉल बनवत नाहीत. ते जमीन किंवा दुकानाची जागा ही भाडेतत्त्वावर विकत घेतात. तर, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी फ्रँचायझी हा प्रकार सुरू केला आहे. बिग बाझारमध्ये, सणानुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांच्या कल कशाकडे हे पाहून केला सामानाची भरती केली जाते. खुपदा वेअरहाऊसमध्ये एक्स्ट्रा सामान आणून ठेवण्याची पद्धत आहे. बिग बाझारचा फुट फॉल दिवसाला साधारण चाडेचार ते 5 हजार एवढा होतो. ऑफसिझनमध्ये फुटफॉल 2 हजारांवरही जातो, तर सिझनमध्ये 8 हजारांपर्यंतही जातो. तर, तेथे दिवसाला कमीत 3 ते 7 लाख रुपयांचा बिझनेस रोज होतो, सिझननुसार हा बिझनेस बदलतो. त्यापैकी साधारण 40 टक्के हा जागेचा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बील, सामान भरणे आणि इतर खर्च होत असे. वर्षांपूर्वी 26 जानेवारीला रिपब्लिक डेच्या सेलच्या एका दिवसात 1 कोटींचा बिझनेस बिग बाझार करत होते.
आता बिग बाझारची अनेक स्टोअर बंद झाले आहेत, फॅशन बिग बाझारची मुंबईतील सर्व स्टोअर्स बंद झाले आहेत. रिटेल कंपनी डबघाईला आली आहे. यातून कंपनी कशी सावरते, हे पाहावे लागेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            