Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kishore Biyani: पागल ठरवण्यात आलेल्या, किशोर बियाणी यांना मॉडर्नट्रेडचे जनक का म्हटले जाते?

uccess story of Future group ceo and retail business king Kishore Biyani

Image Source : www.failurebeforesuccess.com

King of Modern Retail, Kishore Biyani: फ्युचर ग्रुपचा राजिनामा दिल्यामुळे सध्या मॉडर्न रिटेल किंग किशोर बियाणी सध्या चर्चेत आले आहेत. पँटलून्स, बिग बाझार सारखे ब्रँड बनवणारे किशोर बियाणी यांना पागल ठरवण्यात आले होते. मात्र त्यांच्या वेडेपणाने भारतात मॉडर्न रिटेलचा व्यवसाय उभारला. ते कसे बनले मॉडर्नट्रेडचे किंग ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Success Story of Kishore Biyani: उद्योगपती किशोर बियाणी (Kishore Biyani) यांनी कर्जबाजारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या (FRL: Future Retail Limited) निलंबित संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जात आहे. फ्युचर रिटेलने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक किशोर बियाणी यांनी राजीनामा सादर केला आहे. या राजिनामा प्रकरणामुळे उद्योगपती किशोर बियाणी चर्चेत आले आहेत. त्यांना देशातील आधुनिक रिटेल (King of Modern Retail or ModernTrade) व्यवसायाचे संस्थापक मानले जाते.

फ्युचर ग्रुपची एक कंपनी, फ्युचर रिटेल लिमिटेड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ज्या कंपनीला एकेकाळी भारताचे वॉलमार्ट म्हणून ओळखले जात होते. ऑगस्ट 2020 मध्ये, फ्यूचर ग्रुपने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसह (RRVL: Reliance Retail Ventures Limited) 24 हजार 713 कोटी रुपयांचा विलीनीकरण करार जाहीर केला होता. या कराराअंतर्गत, रिलायन्स रिटेलला किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग विभागात कार्यरत असलेल्या 19 फ्युचर ग्रुप कंपन्यांचे अधिग्रहण करायचे होते. मात्र आता फ्युचर ग्रुपच्या सुरक्षित कर्जदारांनी तो नाकारल्याने हा करार रद्द करण्यात आला होता. फ्युचर रिटेलवर 29 कर्जदारांच्या संघाकडून 17 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर, फ्युचर ग्रुपवर एकूण कर्ज 30 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. करार रद्द केल्यानंतर फ्युचर रिटेलला दिवाळखोरी न्यायालय हा एकमेव रिझोल्यूशन पर्याय उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.

आज किशोर बियाणींच्या कंपनीची अवस्था बिकट आहे. मात्र एकेकाळी ही कंपनी रिटेलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. स्वत: किशोर बियाणी यांनी अनेक यशस्वी उद्योग केले आहेत. ते खरेतर कपडा बाजारातले किंग होते, मात्र त्या काळात त्यांचे कपडे कोणतेही रिटेल स्टोअर्स ठेवायला तयार नव्हते, तेव्हा त्यांनी उभारले मॉर्डनट्रेड उभारले. पहिला मॉल सुरू करताना, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याकाळातील व्यावसायिक, उद्योजक यांनी त्यांना 'पागल' ठरवले होते, त्यावेळी त्यांना पागल हे जणू दुसरे नावच मिळाले होते. त्यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांच्याशी संबंध तोडले होते, माक्ष तरिही हार न मानता त्यांनी मॉर्डन रिटेल उभारले, नंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मॉर्डनट्रेडचे साम्राज्य उभे राहिले, म्हणून आज किशोर बियाणींना मॉर्डनट्रेड किंवा मॉडर्न रिटेलचे जनक म्हटले जाते.

अर्टव्हाइल ते बिग बाझार (Erstwhile to Big Bazaar)

किशोर बियाणी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईतील एका कापड व्यापाऱ्यांच्या घरी झाला होता. त्यांनी पुढे आपल्या कौटुंबिक व्यवसायात खूप रस घेतला आणि मग त्यातच उतरले. 1980 मध्ये मुंबईत स्टोन वॉश डेनिम फॅब्रिक विकण्यापासून आपल्या व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या व्यवसायात त्यांना मोठे यश मिळाले. मग ते 1987 मध्ये किशोर बियाणी रेडिमेड कपड्यांकडे वळले. 1987 मध्ये, म्हणजे ते 26 वर्षांचे असताना त्यांनी अर्स्टव्हाइल मेन्स वेअर (Erstwhile Manz Wear)  या नावाने रिटेल व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर, याचे नाव बदलून पँटलून्स (Pantaloons) ठेवले गेले. 1992 मध्ये, पँटालूनचा विस्तार, स्टोअर सुधारणा आणि विपणनासाठी पैसे उभारण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले. यानंतर बियाणी यांनी मागे वळून पाहिले नाही. किरकोळ विक्रीची संपूर्ण परिसंस्था त्यांनी तयार केली होती. एवढेच नाही तर त्यांनी इतर अनेक उद्योजक आणि ब्रँड्सना मार्गदर्शन केले. पँटलून्स म्हणजे कापड बाजारातील क्रांती! रेडिमेड कपड्यांना मोठी चालना मिळाली. पँटलून्समध्ये जाणे हे फॅशनचा, स्टेटसचा भाग बनला. नागरिकांना रेडिमेड कपडे घेण्याची सवय पँटलून्स अर्थात बियाणींनी लावली.  

फ्युचर ग्रुपने 2001 मध्ये भारतात पहिले बिग बाझार (Big Bazaar) डिपार्टमेंटल स्टोअर उघडले. हे स्टोअर 52 हजार चौरस मीटरचे होते, ज्याला बिझनेसच्या भाषेत मॉडर्नट्रेड किंवा मॉल म्हटले जाते. बिग बाझारच्या धर्तीवर पुढे 2003 नंतर इऑरबीट, स्पेन्सर सारखे मॉल उभे राहिले, ज्यात त्यांनी कपड्यांसह, भांडी, इतर वस्तू, इटरीज अशी दुकाने सुरू केली. नंतर बिग बाझारमध्येही असे चित्र दिसू लागले. पुढे बिग बझार इतके जलद लोकप्रिय झाले की 6 वर्षांतच त्याची भारतभरात जवळपास 56 स्टोअर्स उभी केली. तर, 2008 पर्यंत 116 स्टोअर्स उभे केले होते आणि 2019 मध्ये 295 स्टोअर्स अर्थात मॉल उभे राहिले होते.

2007 मध्ये, बियाणीच्या फ्यूचर ग्रुपने विमा क्षेत्रात प्रवेश केला आणि फ्यूचर जनरल इन्शुरन्स सुरू केला. इक्विटी ब्रोकिंग सोल्यूशन्स, वित्तीय उत्पादने, संपत्ती व्यवस्थापन सेवा आणि रिअल इस्टेट ब्रोकिंग ऑफर करत फ्यूचर कॅपिटल देखील त्याच वर्षी अस्तित्वात आले. त्यासह फॅशन डिझाइनर अनित डोंगरे यांच्यासोबत फ्युचर ग्रुपच्या अंतर्गत अँड हा ब्रँड बाजारात आणला, शिवाय बिबा हा ब्रँडही फ्युचरने सुरू केला होता. बिग बाझारचे रुपडे बदलून त्या फूड बाझार, ग्रोसरी सुरू केले. फ्युचर ग्रुपचा रेडिमेड कपडे हा मुख्य व्यवसाय असल्याने, बिग बाझारमधील कपड्यांना हायलाईट करण्यासाठी फॅशन बिग बाझार हा ब्रँड सुरू केला.

किशोर बियाणी यांनी मॉडर्नट्रेडचे इकोसिस्टीम डेव्हल्प केले, ज्यामुळे मॉल हा मॉडर्न प्रकार खऱ्या अर्थाने भारतात रुजला. त्यानंतर रिलायन्स, आदित्य बिर्ला, के. रहेजा यांसारखे उद्योजक पुढे आले आणि त्यांनी मॉडर्नट्रेडमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यांना पागल ठरवण्यात आले होते, मात्र त्यांनी तो वेडेपणा केला नसता तर हे मॉडर्न रिटेल अस्तित्त्वात आले नसते.