Railway Recruitment 2022: सरकारी नोकरी(Government Job) आणि त्यामध्येही रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सर्वात मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून वेळोवेळी रेल्वेमधील नोकऱ्यांची(Railway Job) अधिसूचना जारी केली जाते. जर तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दक्षिण रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी देशभरात भरती चालू झाली आहे. या नोकरीसाठी 10वी,12वी आणि पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊयात सविस्तरपणे.
Table of contents [Show]
दक्षिण रेल्वेमध्ये नोकरीची संधी
- दक्षिण रेल्वेने अलीकडेच पे मॅट्रिक्स लेव्हल 2/3 आणि लेव्हल 4/5 अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी केली आहे
- यासाठी पात्र असणारे उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर 2 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात
- या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 डिसेंबरपासून सुरू झाली आहे
या पदांवर केली जात आहे भरती
- दक्षिण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे स्तर 4/5 अंतर्गत 5 पदे व स्तर 2/3 अंतर्गत 16 पदांची नियुक्ती केली जाणार आहे
- लेव्हल 2 वर निवडलेल्या उमेदवारांना 19900 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल
- लेव्हल 3 करिता 21700 रुपये, लेव्हल 4 करिता 25500 रुपये आणि लेव्हल 5 करिता 29200 रुपये प्रति महिना पगार (Salary) दिला जाईल
पात्रतेचे निकष काय?
- उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे
- नोकरीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयोमर्यादेत कोणतीही सूट रेल्वेकडून देण्यात आलेली नाही
- ही भरती स्पोर्ट्स(Sports) कोट्याअंतर्गत केली जात आहे
- पात्रतेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेली अधिसूचना देखील तपासू शकता
अर्ज करण्याची अंतिम तारीख व शुल्क किती?
- दक्षिण रेल्वे भरती 2022 साठी अधिकृत वेबसाईटवर पात्र उमेदवार 2 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात
- अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क जमा करावा लागेल
- अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट देखील तपासू शकता
कुठे आणि किती जागांची भरती
- जबलपूर विभाग - 884
- भोपाळ विभाग - 614
- कोटा विभाग - 685
- कोटा कार्यशाळा विभाग - 160
- CRWS BPL विभाग - 158
- मुख्यालय/जबलपूर विभाग - 20