नवीन वर्षी तीन स्मॉल कॅप कंपन्या (Small cap Companies) आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना (Share Market Investor) बोनस शेअर (Bonus Shares) देणार आहेत. त्याविषयीची घोषणा कंपन्यांनी केलेली आहे. आणि रेकॉर्ड डेट (Record Date) तसंच इतर माहितीही सेबी (SEBI) तसंच स्टॉक एक्सचेंजला दिलेली आहे. त्यानुसार, या कंपन्या, त्यांची रेकॉर्ड डेट आणि बोनस शेअरचं प्रमाण यांची माहिती घेऊया…
सेक्युअर क्रेडेन्शिअल्स लिमिटेड (Secure Credentials Limited)
ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअरचं वाटप करणार आहे. आणि त्यासाठीची रेकॉर्ड डेट आहे आज म्हणजे 4 जानेवारी. रेकॉर्ड डेट म्हणजे त्या तारखेला तुमच्याकडे असलेल्या शेअरवर हा बोनस तुम्हाला लागू होईल. तसंच 3:1 हे गुणोत्तर आहे. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरमागे एक बोनस शेअर तुम्हाला मिळेल.
या कंपनीचा शेअर NSE वर 118 रुपयांच्या आसपास ट्रेड होत आहे. आणि मागच्या वर्षी शेअरने 62% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
जीएम पॉलीप्लास्ट (GM Polyplast)
जीएम पॉलिप्लास्ट कंपनीही स्मॉलकॅप कंपनी आहे. आणि तिने गुंतवणूकदारांना 6:1 प्रमाणात बोनस वाटप जाहीर केलं आहे. बोनस वाटपासाठी रेकॉर्ड तारीख 4 जानेवारी इतकी आहे. या तारखेपर्यंत तुमच्याकडे असलेल्या 1 शेअर मागे 6 बोनस शेअर तुम्हाला लागू होतील.
या शेअरने मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 591% परतावा दिला आहे.
KPI ग्रीन एनर्जी (KPI Green Energy)
ऊर्जा क्षेत्रातली ही कंपनी सौर ऊर्जा आणि इतर पर्यावरणपूरक ऊर्जा स्त्रोतांवर काम करते. या कंपनीने गुंतवणूकदारांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर देऊ केले आहेत. आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख ठरवली आहे 18 जानेवारी.
गेल्यावर्षी या शेअरने गुंतवणूकदारांना 63% परतावा मिळवून दिला आहे.