जी एम पॉलिपास्टच्या शेअरला आज सोमवारी 2 जानेवारी 2022 रोजी अप्पर सर्किट लागले. कंपनीचा शेअर 5% ने वाढला. जी एम पॉलिपास्टने बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 1 शेअरवर 6 शेअर बोनस दिले जाणार आहेत. यासाठी बुधवार 4 जानेवारी 2023 ही तारिख निश्चित करण्यात आली आहे. मात्र या घोषणेने आज जी एम पॉलिपास्टच्या शेअरची मागणी वाढली.
आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर जी एम पॉलिपास्टचा शेअर 1281 रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर तो 1282.85 रुपयांपर्यंत वाढला. दुपारी 1.30 वाजता 4.91% तेजीसह 1281.80 रुपयांवर अप्पर सर्किटमध्ये लॉक झाला. मात्र त्यानंतर या शेअरला विक्रीचा फटका बसला. बाजार बंद होता जी एम पॉलिपास्टचा शेअर 2.60% घसरणीसह 1190 रुपयांवर बंद झाला.
जी एम पॉलिपास्ट 1 शेअरवर 6 शेअर बोनस देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअरसाठी मान्यता दिली. बोनस शेअरसाठी बुधवार 4 जानेवारी 2023 ही तारिख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी जी एम पॉलिपास्टचा शेअर एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे.
मागील एक वर्षात गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न्स
जी एम पॉलिपास्टच्या शेअरमध्ये मागील एक वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. जी एम पॉलिपास्टचा शेअर वर्षभरात 662% वधारला. सहा महिन्यात जी एम पॉलिपास्टच्या शेअरमध्ये 436% वाढ झाली. तर महिनाभरात तो 50% ने वधारला. वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी जी एम पॉलिपास्टमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना या शेअरमधून छप्परफाड रिटर्न्स मिळाले.