Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bisleri India आली आयपीएलच्या पिचवर…गुजरात टायटन्स बरोबर करार  

Bisleri India

Image Source : Bisleri India

Bisleri India ने आयपीएलची गतविजेती टीम गुजरात टायटन्सबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. आणि या करारातून कंपनीने आयपीएलच्या पिचवर प्रवेश केला आहे. एकीकडे बिस्लेरी कंपनीचं टाटा कंपनीत विलिनीकरण सुरू आहे. आणि दुसरीकडे कंपनीने हा करार केलाय

बाटलीबंद पाण्यासाठी (Sealed Water Bpttle) देशातला नावाजलेला ब्रँड बिस्लेरी (Bisleri India) आता आयपीएलबरोबर (IPL 2023) जोडला गेला आहे. कंपनीने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या गतविजेत्या टीमबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. बिस्लेरी कंपनीचे मालक रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांनी आपल्या लिंक्ड-इन अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.      

आयपीएलच्या 2023 (IPL 2023) हंगामापासून हा करार लागू होईल. आणि बिस्लेरी कंपनी गुजरात टायटन्सचे हायड्रेशन पार्टर (Hydration Partner)असतील. थोडक्यात, मॅच आणि सरावा दरम्यान टायटन्सचे खेळाडू बिस्लेरीचं पाणी पिताना दिसतील. या कराराबद्दल माहिती देताना जयंती यांनी आपल्या लिंक्ड-इन पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘क्रिकेट हा खेळ अख्ख्या देशाला एकत्र आणतो. आणि त्याचबरोबर खेळ तंदुरुस्ती आणि चपळता यांचा मापदंड आहे. गुजरात टायटन्स बरोबर केलेल्या करारातून आम्हाला हेच दाखवायचंय की, आम्ही लोकांच्या तंदुरुस्ती आणि चपळता वाढवण्याच्या प्रयत्नांत त्यांच्याबरोबर आहोत.’     

यापूर्वीही मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू या मॅरेथॉन स्पर्धांबरोबर बिस्लेरीने अशाप्रकारचे करार केलेले आहेत. तर गुजरात टायटन्स कंपनीनेही या कराराबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.      

‘बिस्लेरी सारखी कंपनी आमच्या आयपीएल मोहिमेत सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आमची टीम आणि बिस्लेरी कंपनी यांच्यात साम्य आहे. कारण, आम्ही दोघंही आधीपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतो. दोघांमधला हा करार फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे,’ असं गुजरात टायटन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंदर सिंग यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.      

बिस्लरी - टाटा करार आणि जयंती चौहान Bisleri Tata Deal & Jayanti Chauhan  

अलीकडेच टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स कंपनीने बिस्लेरी कंपनीबरोबर करार केला आहे. आणि त्यानुसार, टाटा कंपनी 6000-7000 कोटी रुपयांमध्ये बिस्लेरीला विकत घेणार आहे . हा करार सध्या अंतिम टप्प्यात आहे. आणि असं असताना बिस्लेरीचे मूळ मालक रमेश चौहान यांनी गुजरात टायटन्सबरोबर हा करार केलाय.      

बिस्लेरी ही देशातली बाटलीबंद पाण्याची विक्री करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. देशभर हा ब्रँड पसरलेला आहे. कंपनी टाटाला विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा संस्थापक आणि मालक रमेश चौहान यांनी एका मुलाखतीत आपल्यानंतर हा उद्योग बघणारं कुणी नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांना घरच्या उद्योगात रस नाही, अशी चर्चा तेव्हा रंगली होती.     


जयंती यांनी तेव्हाही बातमी पूर्णपणे समजून न घेता, मीडियाने आपलं मत बनवल्याचं वक्तव्य केलं होतं. आणि आता बिस्लेरीचा गुजरात टायटन्स बरोबरच करार पार पाडताना त्यांनी यात पुढाकार घेतला आहे. आणि स्वत: लिंक्ड-इन अकाऊंटवर या कराराची घोषणाही केली. थोडक्यात, बिस्लेरीच्या दैनंदिन कारभारात आपला सहभाग आहे, असंच त्यांना सांगायचं आहे.