Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TATA-Bisleri Deal : कोण आहे जयंती चौहान; 7 हजार कोटींची बिसलेरी कंपनी चालवण्यासाठी दिला नकार!

Who is Jayanti Chauhan

Image Source : www.breezyscroll.com

TATA-Bisleri Deal : जयंती चौहान ही बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी (Ramesh Chauhan Daughter) आहे. रमेश चौहान यांचे वय झाल्यामुळे ते व्यवसायात लक्ष देऊ शकत नाहीत; तर त्यांच्या मुलीला वडिलांच्या व्यवसायात इंटरेस्ट नसल्याचे रमेश चौहान यांचे म्हणणे आहे.

Tata Consumer-Bisleri Deal : भारतातील सर्वांत मोठी मिनरल वॉटर कंपनी Bisleri चे मालक रमेश चौहान हे लवकरच बिसलेरी कंपनी टाटा ग्रुपला विकणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टाटा कन्झ्युमर प्रोडक्टस् लिमिटेड (Tata Consumer) आणि बिसलेरी यांच्यात 7 हजार कोटींची डील झाली आहे. पण या वृत्ताला दोन्ही कंपन्यांकडून दुजोरा मिळालेला नाही.

बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांचे वय 82 वर्षे असून त्यांची प्रकृती त्यांना हवी तितकी साथ देत नसल्यामुळे चौहान यांनी बिसलेरीचा व्यवसाय वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या पश्चात हा व्यवसाय कोण सांभाळणार याबाबत खुद्द चौहान संभ्रमात आहेत. त्यामुळे बिसलेरी टाटाला विकणार! या चर्चेला अधिक वाव मिळत आहे. रमेश चौहान यांना एक मुलगी (Bisleri Owner Daughter) आहे. तिचे नाव जयंती चौहान (Jayanti Chauhan) आहे. त्यांच्या मते, जयंती हिला वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात काहीच इंटरेस्ट नाही.

कोण आहे जयंती चौहान! who is Jayanti Chuhan?

जयंती चौहान ही बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी एकुलती एक मुलगी आहे; तिचे वय 37 वर्षे आहे. ती बिसलेरी इंटरनॅशनल कंपनीचे व्हाईस चेअरपर्सन आहे. गेल्या 13 वर्षांपासून ती हा व्यवसाय आपल्या वडिलांसोबत सांभाळत आहे. जयंतीने 24 व्या वर्षापासून बिसलेरीसाठी काम करण्यास सुरूवात केली होती. बिसलेरी व्यतिरिक्त जयंती बिसलेरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचलर मिनिटर वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक आणि बिसलेरी हॅण्ड प्युरीफायार प्रोडक्टसच्या ऑपरेशनची जबाबदारी सांभाळत आहे.


Bisleri मिनरल वॉटर व्यवसायाचा बेताज बादशाह!

अनेक वर्षांपासून मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरी ब्रॅंडचे वर्चस्व आहे. बिसलेरीने समाजात एक विश्वासार्हता निर्माण केली. बिसलेरीला स्पर्धा देण्यासाठी कोको कोला, पेप्सिको,  पार्ले अॅग्रो, भारतीय रेल्वे, माणिकचंद ग्रुप यांचे ब्रॅंड बाजारात आले. पण याचा काहीच परिणाम बिसलेरीवर झालेला नाही.