दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी सोने खरेदी करणे खूप कठीण झाले आहे. नवनवीन दागिने खरेदी करणे, विविध प्रकारचे लुक करुन त्यावर मॅचिंग ज्वेलरी घेऊन फोटो शूट करणे, या गोष्टी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अशातच 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी सुद्धा चर्चेत आहे. दागिने घ्यायची इच्छा आहे पण बजेट नाही तर तेव्हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. महिलांचा कल याकडे जास्त वाढलेला दिसत आहे. चला तर माहित करून घेऊ, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार होते? त्याची किंमत कशी ठरवली जाते?
Table of contents [Show]
1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार केली जाते?
1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये कॉपर आणि सोने असते. संपूर्ण ज्वेलरीची डिझाईन कॉपरने बनवून त्यावर 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा चढवला जातो. त्याला पॉलिश दिले जात नाही. उदा. 1 ग्रॅम सोन्याची रिंग असेल. तिचे वजन 5 ग्रॅम असेल, तर त्यात 4 ग्रॅम कॉपर आणि ग्रॅम सोने असते. त्या ज्वेलरीची शाईन सततच्या वापराने कमी होते. पूर्णतः खराब होत नाही. आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम जवळील गाव चिलातलापुरी इमिटेशन ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे. इथले कारागीर कॉपर, जस्त, चांदी या धातुवर सोन्याचे कोटींग करून ही 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी तयार करतात. त्यावर चमक आणण्यासाठी विशिष्ट प्रकारचे द्रव्य वापरले जाते.
ज्वेलरीची किंमत आणि रिटर्न, एक्सचेंज पॉलिसी
1 ग्रॅम ज्वेलरीचा मार्केटमध्ये असलेला सोन्याचे भाव, वापरलेल्या कॉपरचे भाव आणि मेकिंग चार्जेस या सर्व बाबी लक्षात घेऊन किंमत ठरवली जाते. यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. 1 ग्रॅम ज्वेलरी ही प्रत्येक सराफा बाजारामध्ये वेगळ्या पद्धतीने विकली जाते. त्यावरील गॅरंटी, वॉरंटी, रिटर्न पॉलिसी/एक्सचेंज पॉलिसी या सर्व ज्वेलर्सनी स्वतः ठरवलेल्या पद्धतीने असतात. काही ज्वेलर्स रिटर्न पॉलिसी देतात तर काही एक्सचेंज पॉलिसी देतात.
या दोन्हीमध्ये 50% रक्कम परत दिली जाते. रिटर्न केल्यास 50% परत मिळेल. एक्सचेंज केल्यास 50% रक्कम अॅड करून दुसरी ज्वेलरी घ्यावी लागेल. रिटर्न आणि एक्सचेंजची रक्कम तुम्ही खरेदी केलेल्या रकमेच्या 50% गृहित धरली जाते. यात चालू असलेला भाव गृहित धरला जात नाही. ज्या ज्वेलर्सकडून ही ज्वेलरी तुम्ही खरेदी केली त्याच्याकडेच एक्सचेंज, रिटर्न करू शकता. यासाठी पावती सोबत असणे आवश्यक आहे.
बेनटेक्सपेक्षा 1 ग्रॅम दागिने कधीही परवडणारे
काही वर्षांपूर्वी बेनटेक्सचे दागिने बाजारात लोकप्रिय झाले होते. अजूनही बऱ्यापैकी लोक टेक खरेदी करतात. पण त्याची गॅरंटी ही 1 वर्षापर्यंत असते. त्यामुळे काही महिलांशी चर्चा केली असता त्या म्हणतात, बेनटेक्सपेक्षा 1 ग्रॅम दागिने कधीही परवडणारे आहे. बेनटेक्सच्या किमती सुद्धा आता वाढलेल्याच आहेत. मग खर्च तर होणारचं. त्यापेक्षा काही पैसे जास्त देऊन 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी वर्षानुवर्षे टिकत असेल तर हेच ऑप्शन बेस्ट असू शकते.
1 ग्रॅम ज्वेलरी खरेदी करताना ही काळजी घ्या
- दागिने खरेदी करतांना विश्वासू व्यक्तीकडूनच करा.
- गावात येणाऱ्या फेरिवाल्यांकडून दागिने खरेदी करु नका.
- दागिन्यांच्या खरेदी आधी गॅरंटी, वारंटी चेक करा.
- किंमतीनुसार परवडत असेल तरच हा दागिना खरेदी करा.
- खरेदी केलेल्या दागिन्यांची रितसर पावती घ्या.
- पावतीवरिल रक्कम चेक करा.