Akshaya Tritiya 2023: सध्या सोन्याची किंमत 63,000 रुपये आहे. सोन्याची गेल्या एक महिन्यातच प्रचंड दर वाढ झाल्यामुळे सगळेच ग्राहक या दिवशी सोने खरेदी न करता, जरा थांबुन सोन्याची खरेदी करेल, असे काही तज्ञांचे मत आहे. तर सोने हा गुंतवणूकीचा लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय असल्याने गुंतवणूकदार याही अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करेल, असेही काही तज्ञांचे मत आहे. तर दोन्ही बाबींचा विचार करुन अनेक सराफा दुकानदारांनी ग्राहकांना सोने खरेदीवर अनेक ऑफर देणे सुरु केले आहे.
आरके ज्वेलर्स
आरके ज्वेलर्सने देखील ग्राहकांसाठी अक्षय्य तृतीये निमित्त वेगवेगळ्या योजनांची ऑफर देऊ केलेली आहे. त्यापैकी एक म्हणजे केवळ 59,900 रुपयांमध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी देत आहे. सोन्याची सध्याची किंमत सुमारे ६३,००० रुपये आहे. ही ऑफर फक्त 22 आणि 23 एप्रिल या दोन दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. तर यावर जीएसटी अतिरिक्त लागणार आहे, अशी माहिती आरके ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहन शर्मा यांनी दिली.
पीपी ज्वेलर्स
'आम्ही या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांगल्या विक्रीची अपेक्षा करत आहे. भारतात, शुभ सणांशी सोन्याचा एक मजबूत आर्थिक बंध आहे आणि लाखो लोक अक्षय्य तृतीयेला अगदी कमीत कमी 5 ग्रॅम तरी सोने खरेदी करतात. हे लक्षात घेऊन, आम्ही सर्व सोन्याच्या दागिन्यांच्या घडनावळीवर 40 टक्के सूट देत आहोत,' अशी माहिती पीपी ज्वेलर्सचे संचालक पवन गुप्ता यांनी दिली.
'ग्राहकांची बदलत गेलेली आवड आणि गरजा पूर्ण करण्यासाठी सराफा उद्योग विकसित होत आहे आणि अक्षय्य तृतीया सारख्या प्रसंगी खरेदीचे अनेक नवीन ट्रेंड उदयास येत आहेत. सोन्याच्या किरकोळ उद्योगाने हिरे आणि पोल्की ज्वेलरी यांसारख्या इतर श्रेणींचाही विस्तार केला आहे, म्हणून आम्ही सर्व डायमंड ज्वेलरींच्या घडनावळीवर 40 टक्के सूट देत आहोत,' असेही पवन गुप्ता पूढे म्हणाले.
याप्रमाणे अनेक सोन्याच्या दुकानदारांनी सर्वच शहरांमध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना देणे आणि आकर्षक डिझाईन देणे सुरु केलेले आहे.